Pernem News : सिमेंट क्रॉँक्रिट मिक्सिंग प्रकल्पाला आर्लेकरांसह सरपंचाचा तीव्र विरोध

प्रदूषण नको : धारगळमधील लोकांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक
MLA Pravin Arlekar
MLA Pravin ArlekarDainik Gomantak
Published on
Updated on

धारगळ येथील औद्योगिक वसाहत आणि लोक वस्तीच्या शेजारीच उभारण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सिंग प्रकल्पाचे काम आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अनिकेत साळगावकर माजी सरपंच भूषण नाईक माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, रोहिदास हरमलकर, कोनाडकर, मुरारी परब, लक्ष्मण गावस डॉक्टर युगा आदींच्या स्थानिक लोकांच्या उपस्थितीत काम बंद पाडले.

MLA Pravin Arlekar
वास्कोच्या रवींद्र भवनमध्ये असलेल्या सरकारी कार्यालयांना जागा खाली करण्याचे निर्देश; 'हे' आहे कारण

कोणत्याही परिस्थितीत प्रदूषणकारी प्रकल्प सुरू करू दिला जाणार नाही, लोकांना विश्वासात न घेता स्थानिकांची मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असतानाही त्या प्रकल्पाला परवानगी कशी काय मिळाली? पंचायतीने दिलेला ‘ना हरकत’ दाखला मागे घेतलेला आहे.

येथे प्रकल्प नको, भविष्यात अशा प्रकारचा प्रकल्प नकोच, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी सांगितले. आता अशा प्रकाराकडे पंचायतीने लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली.

21 रोजी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळ, सरपंच अनिकेत सागावकर, पंच सदस्य भूषण नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, न्हानू हरमलकर, श्री. कोनाडकर ॲड. मुरारी परब आधी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आर्लेकर म्हणाले, लोक वस्तीमध्ये कसल्याच प्रकारचे प्रदूषणकारी प्रकल्प उभारताना संबंधिताने स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज होती. हा विषय जेव्हा ग्रामसभेमध्ये आला होता. त्यावेळी ग्रामसभेत याला कडाडून विरोध करण्यात आला.

आपल्याकडे तक्रारी आल्यानंतर आपण पंचायतीला सूचना केली. परवाना मागे घेण्यासाठी विनंती केल्यानंतर पंचायत मंडळाने दिलेला परवाना रद्दबातल ठरवलेला आहे. आता या प्रदूषणकारी प्रकल्पाला कसल्याच प्रकारे थारा देऊ नये. हा प्रकल्प आजपासून बंद होणार, नागरिकांनी बिनधास्त राहावे, असा आशावाद यावेळी आणि विश्वास आमदार प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थितांना दिला.

सरपंच अनिकेत साळगावकर म्हणाले, आर्लेकर यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन हा प्रकल्प बंद पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. आमदाराचे अभिनंदन करतो. अशा प्रदूषणकारी प्रकल्पांना या ठिकाणी थारा नको.

MLA Pravin Arlekar
Panaji police station attack : आठशे लोकांचा जमाव घेऊन बाबूश चालून आले!

माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर म्हणाले, भर लोकवस्तीमध्ये अशा प्रदूषणकारी प्रकल्पाला थारा देणारे अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन किंवा या लोकवस्ती मधील घरांना टीसीपीकडून परवाने दिलेले आहेत.

हे परवाने डोळे झाकून दिले होते का? असा सवाल करून लोग वस्तीमध्ये असलेल्या प्रकल्पाला आम्ही कदापि थारा देणार नाही, असा इशारा देऊन याच परिसरात आमदार प्रवीण आर्लेकर यांचेही निवासस्थान आहे. या प्रकल्पामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य आणि नवीन रोगराईला आमंत्रण मिळेल, अशी भीती व्यक्त करून आम्ही या प्रकल्पाला थारा देणार नाही.

आचारसंहितेचा गैरफायदा

धारगळ दोन खांब येथील लोकवस्ती शेजारी काँक्रीट सिमेंट मिक्सिंग प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. ज्यावेळी पंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली होती. त्यावेळी आचारसंहितेचा गैरफायदा घेतला गेला.

त्या काळात या प्रकल्पाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता, ‘ना हरकत’ दाखला दिला होता. त्या कार्यकाळात हा प्रकल्प उभारण्यात आला नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये कार्यकाळ संपला होता. तरीही काम सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com