Goa startups led by women entrepreneurs Dainik Gomantak
गोवा

Startups in Goa: गोमंतकीय महिलांची भरारी! 270 स्टार्टअपचे सांभाळतात नेतृत्व; दहा हजार रोजगार निर्मितीचा मनोदय

Women-led businesses in Goa: ‘डीआयटीई अँड सी’चे संचालक प्रसन्न आचार्य यांनी गोवा स्टार्टअप धोरण २०२४ विषयी सविस्तर माहिती दिली. या धोरणाअंतर्गत, २०२७ पर्यंत १,००० स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात सध्या ५७० डीपीआयआयटी मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत, ज्यापैकी २७० स्टार्टअप महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. यापैकी ४० टक्के स्टार्टअप प्रारंभिक किंवा स्केलिंग टप्प्यावर आहेत, अशी माहिती एसआयटीपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत यांनी दिली. नाविन्य आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी गोवा सरकारने राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२५ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

‘डीआयटीई अँड सी’चे संचालक प्रसन्न आचार्य यांनी गोवा स्टार्टअप धोरण २०२४ विषयी सविस्तर माहिती दिली. या धोरणाअंतर्गत, २०२७ पर्यंत १,००० स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय १०,००० रोजगार निर्मितीचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील स्टार्टअपना सहकार्य व प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. यामध्ये सहा इनक्यूबेटर केंद्रे, १५ हून अधिक को-वर्किंग जागा, स्टार्टअप कॅफे आणि व्हेंचर स्टुडिओ यांचा समावेश आहे.

कार्यक्रमात उद्योजक, मार्गदर्शक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ यांच्यात संवाद साधण्यासाठी उत्तम संधी मिळाली. नाविन्यपूर्ण कल्पना, ज्ञानवृद्धी आणि सहकार्याच्या संधी यामुळे स्टार्टअपसाठी आदर्श व्यासपीठ निर्माण झाले. स्थानिक स्टार्टअपनी आपापल्या नवकल्पना सादर केल्या. शिवोना फर्नांडिस (सोलो नेटवर्क) यांनी इंटर्नशिप आणि मेंटॉरशिप शोधणाऱ्या ॲपचे प्रात्यक्षिक सादर केले.

गुंतवणूकदारांकडून १३०० कोटी

गोव्यातील स्टार्टअप्सनी आतापर्यंत खाजगी गुंतवणूकदारांकडून १३०० कोटी रुपये निधी उभा केला आहे, तर केंद्र आणि राज्य सरकारकडून १५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

मार्गदर्शन सत्रे

नम्रता चावला (संस्थापक, माइंडमाइन्स) यांनी उत्पादन विकास आणि किमान व्यवहार्य उत्पादन (एमव्हीपी) यावर सत्र घेतले.

वर्षा अदुसुमिली (सह-संस्थापक, के स्टार्ट) यांनी निधी उभारणीच्या तंत्रांवर मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT