Goa Startups: गोव्यात स्टार्टअप्सला मिळणार बूस्टर; HDFC देणार 99 लाखांची आर्थिक मदत

गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाने HDFC बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे.
Goa Startups
Goa StartupsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Startups In Goa: गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाने HDFC बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. स्टार्टअपसाठी प्रोत्साहन आणि जागरुकता हे या कराराचे उद्दिष्ट असून, एचडीएफसी या उपक्रमासाठी 99 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे.

एचडीएफसी CSR उपक्रमाद्वारे राज्यात अधिक स्टार्टअप्स आणण्यासाठी स्टार्टअप्सना मदत करेल, असे आयटी संचालक यशस्विनी बी यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सरकारी योजना आणि गोव्यातील प्रमुख स्टार्टअप्सची यशोगाथा सांगणारे गोवा स्टार्टअप डायजेस्ट 2023 चे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.

उद्योजकता ही एक संस्कृती आहे याची सरकारला खात्री पटली आहे. राज्यात उद्योजकतेची संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे गोवा स्टार्टअप सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी एस प्रशांत म्हणाले.

गोवा स्टार्टअप सेलच्या वतीने यावेळी गोव्यातील यशस्वी स्टार्टअप संस्थापकांचा सत्कार केला.

डी एस प्रशांत यांनी यावेळी राज्यातील यशस्वी स्टार्टअप्स आणि आयटी कंपन्यांच्या संस्थापकांना मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

गोव्यात 439 नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत आणि कोरोनानंतर याच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतेक स्टार्टअप्स पर्यटन, अन्न आणि पेये आणि आयटी सेवा या क्षेत्रातील आहेत, असे यशस्विनी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Economic Discipline
BRICS India Trade Deficit
Goa Gruha Aadhaar Scheme Amount Increase
Nepal Flood Recovery
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com