Dayanand Social Security Scheme Dainik Gomantak
गोवा

Goa: दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतून 14,000 अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली; 39 कोटी रुपये केले वसूल

Dayanand Social Security Scheme: मृत लाभार्थ्यांची माहिती काढणे आणि त्यानंतर बँकेला पैस परत मागणे ही तारेवरची कसरत होती, असे पंचवाडकर म्हणाले.

Pramod Yadav

Dayanand Social Security Scheme

पणजी: दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (DSSS) १४ हजार अपात्र लाभार्थ्यांची नावे समाज कल्याण संचालनालयाने वगळली आहेत. यात पूर्णपणे व्यवसाय करणाऱ्या २००० लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ३९ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असला तरी देखील त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा केले जात होते. काही लाभार्थ्यांचा मृत्यू २०११ तर काहींचा २०१४ मध्ये झाला होता, अशी माहिती समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे. मृत लाभार्थ्यांची माहिती काढणे आणि त्यानंतर बँकेला पैसे परत मागणे ही तारेवरची कसरत होती, असे पंचवाडकर म्हणाले.

बँकेला अशा ५००० लाभार्थ्यांची माहिती देऊन पैसे परत करण्याची विनंती करण्यात आली होती. समाज कल्याण खात्याच्या वतीने योजनेच्या लाभार्थ्यांची यादी सातत्याने अद्यावत करण्याचे काम केले जात आहे. यातून अपात्र लाभार्थी वगळण्याची देखील प्रक्रिया सुरु आहे. ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळत होता, यात सुधारणा करुन आता ७५ ते ८० वयोगटातील नागरिकांना याचा लाभ मिळतो.

योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती तपासण्याचे काम सुरु आहे. जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवली जात असून, लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास यादीतून संबधिताचे नाव हटवता येईल. योजनेचे पैसे सहा महिन्यापर्यंत न काढल्यास पुढे पैसे काढण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती बँकेला करण्यात आली आहे. लाभार्थ्यांने वैध कारणासह पत्र सादर केल्यास बँकेकडून पैसे काढण्यास परवानगी दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT