Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Goa bench Fire Case: हडफडे येथील बर्च अग्निकांडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी कठोर भूमिका घेतली.
Goa bench Fire Case
Hadfade Birch Fire CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील बर्च अग्निकांडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी कठोर भूमिका घेतली.

वारंवार निर्देश देऊनही उत्तर दाखल न करणाऱ्या केरी-तेरेखोल, मांद्रे, मोरजी आणि कोलवा या चार ग्रामपंचायतींच्या सचिवांना न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Goa bench Fire Case
Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पुढील सुनावणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, त्या दिवशी चारही सचिवांची न्यायालयातील वैयक्तिक उपस्थिती पंचायत संचालकांनी सुनिश्चित करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

आदेशानंतरही ना उत्तर, ना उपस्थिती

न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश देऊनही चारही ग्रामपंचायतींनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही किंवा न्यायालयात उपस्थितीही लावली नाही. याबद्दल खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bardez Land Scam
Goa High Court Double Murder Acquittal
Chimbel Illegal Borewells
Mapusa Illegal House Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com