Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या रनवेवरील लाईट्स पडल्या बंद; 3 मोपावर, एक फ्लाईट मुंबईला वळवली

Dabolim Airport Runway: चेन्नईतून गोव्यात येणारी फ्लाईट सात वाजता विमानतळावर उतरणार होती त्यापूर्वीच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dabolim Airport Runway
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या रनवेवरील लाईट्स गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बंद पडल्या. याचा जवळपास १५ फ्लाईट्सना फटका बसला. तीन फ्लाईट्स उत्तरेतील मोपा तर एक फ्लाईट मुंबईला वळविण्यात आली. तसेच, १२ फ्लाईट्सला विलंब झाला.

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवरील लाईट्स तांत्रिक कारणामुळे गुरुवारी (१५ मे) रात्री सातच्या सुमारास बंद पडल्या. यामुळे दाबोळीवर उतरणाऱ्या तीन फ्लाईट्स मोपा विमानतळावर वळविण्यात आल्या तर, हैदराबाद - गोवा फ्लाईट मुंबईला वळविण्यात आली. चेन्नईतून गोव्यात येणारी फ्लाईट सात वाजता विमानतळावर उतरणार होती त्यापूर्वीच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dabolim Airport Runway
पोलिसाची नोकरी प्रेयसीला नव्हती पसंत, अर्धवट सोडले ट्रेनिंग; नैराश्यातून प्रियकराने गर्लफ्रेन्डवर केला सुरी हल्ला

हवाई वाहतूक नियंत्रकाला रनवेची माहिती मिळाल्यानंतर चेन्नईतून येणाऱ्या विमान चालकाला संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली व विमान मोपा येथे वळविण्यास सांगितले. तसेच, दिल्ली आणि रायपूर येथून दाबोळीवर उतरणाऱ्या विमानांना देखील मोपा येथे वळविण्याची सूचना करण्यात आली. तर, १२ विमानांना विलंब झाल्याची माहिती आहे.

भारतीय नौदलाच्या वतीने दाबोली विमानतळाची देखभाल केली जाते. नौदलाचा आयएनएस हंसा तळ येथेच आहे. दरम्यान, रनवेवरील बंद झालेल्या लाईट्स ४५ मिनिटांनी सुरु करण्यात आल्या. यानंतर विमातळवरील वाहतूक सुरळीत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com