Pakistan: भारतासोबत शांतीवार्ता करण्यास तयार पण काश्मीर प्रश्नाची अट; पाकचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य

Shehbaz Sharif: पंजाब प्रांतातील कामरा हवाई तळाला भेट दिल्यानंतर शेहबाज शरीफ लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधत होते.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक हवाई आणि लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतासोबत झालेल्या चकमकीत पाकिस्तानला मोठा फटका बसल्याने अखेर त्यांनी शस्त्रसंधीची विनंती केली. कंबरडे मोडल्यानंतर आता पाकिस्तान गुडघ्यावर आला असून, शांतीवार्ता करण्यास ते तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी केले आहे.

पंजाब प्रांतातील कामरा हवाई तळाला भेट दिल्यानंतर शेहबाज शरीफ लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधत होते. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट देऊन जवानांशी संवाद साधला. मोदींचे अनुकरण करत पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांनी देखील सुरुवातीला सियालकोट येथील पसरुर छावणीला भेट दिली. यानंतर आता त्यांनी कामरा हवाई तळाला भेट दिली आहे. यावेळी शरीफ यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.

Shehbaz Sharif
पोलिसाची नोकरी प्रेयसीला नव्हती पसंत, अर्धवट सोडले ट्रेनिंग; नैराश्यातून प्रियकराने गर्लफ्रेन्डवर केला सुरी हल्ला

भारतासोबत शांती वर्ता करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, काश्मीरच्या मुद्यावर देखील चर्चा होणार, अशी अट शाहबाज शरीफ यांनी घातली आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पाकिस्तानसोबत यापुढे केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याच मुद्यावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले आहे. भारताची भूमिक स्पष्ट आहे दहशतवाद, व्यापार आणि संवाद या गोष्टी एकत्र होणार नाहीत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ६ आणि ७ मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले होते. यात १०० दहशतवादी ठार झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, भारताने यशस्वीपणे तो परतावून लावला.

Shehbaz Sharif
Goa Majhi Bus Scheme: खासगी बस मालकांसाठी आनंदवार्ता! 'माझी बस योजने'तून मिळणार अनुदान, विमा आणि आर्थिक सहाय्य

पाकिस्तानने भारतासोबत शांतीवार्ता करण्यासाठी काश्मीर प्रश्नाची अट घातली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याशिवाय दुसरी चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, शस्त्रसंधीनंतरही भारताने अद्याप जल सिंधू पाणी वाटप करार स्थगितच ठेवलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com