

नवी दिल्ली: बाललैंगिकतेशी संबंधित मजकुरास प्रसिद्धी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकल्याबद्दल केंद्र सरकारने संताप व्यक्त करताच ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी माफी मागितली.
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाललैंगिकता, ‘डीपफेक’ आशय प्रसिद्ध झाला आणि तांत्रिक त्रुटी राहिल्याचे मान्य करत झुकेरबर्ग यांनी खेद व्यक्त केला आहे. मोदींचा व्हिडिओ हटविल्याबद्दल तीन दिवसांत माफी मागण्याचे आदेश संसदीय समितीने आजच ‘मेटा’ला
दिल्यानंतर तातडीने चक्रे फिरून कंपनीने माफी मागितली. परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ पाच ते सहा तासांसाठी ‘फेसबुक’वरून हटविण्यात आला होता.
नंतर तो पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला असला तरी ही बाब समितीने अत्यंत गांभीर्याने घेतली. ‘मेटा’चे जागतिक घडामोडींचे प्रमुख जोएल काप्लान यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी पाचारण केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.