विद्यार्थी (प्रतीकात्मक चित्र) दैनिक गोमन्तक
गोवा

विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे बारावीची परीक्षा 'ऑनलाईन'

'ऑफलाईन' परीक्षेचा निर्णय मागे घेत नसल्यास विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा घेतला होता पवित्रा

Dainik Gomantak

Goa: काही मोजक्याच विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे बारावीची परीक्षा 'ऑनलाईन' (Online Exam) घेण्याची पाळी डिचोलीतील एका नामांकित संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयावर आली आहे. विशेष म्हणजे या विद्यालयात 'एसओपी' पाळून बारावीचे 'ऑफलाईन' वर्ग (Offline Classes) सुरळीतपणे चालू आहेत. तरीदेखील परिपूर्ण अभ्यास झालेला नाही आणि अन्य विद्यालयांतर्फे 'ऑनलाईन' परीक्षा घेण्यात येत असल्याचा मुद्दा पुढे करून काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून 'ऑफलाईन' परीक्षा (Oppose for Offline Exam) घेण्यास विरोध केला. व्यवस्थापनाने ऑफलाईन परीक्षेचा नेमके फायदे सांगून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी आपल्या पवित्र्यापासून मागे हटले नाहीत.

'ऑफलाईन' परीक्षेचा निर्णय मागे घेत नसल्यास आंदोलनाचा पवित्राही या विद्यार्थ्यांनी घेतला. अखेर व्यवस्थापनाने 'ऑफलाईन' परीक्षेचा निर्णय मागे घेतला. या विद्यालयात सध्या बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत आहे. यामुळे ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी केलेल्या अन्य विद्यार्थ्यांची मात्र निराशा झाली. या प्रकाराबाबत काही पालकांनीही नाराजी व्यक्त केली.

परीक्षा 'ऑफलाईन'च हवी

ऑनलाईन परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होत नाही. तेव्हा ऑनलाईन शिकवणी घेतली, तरी परीक्षा ही 'ऑफलाईन'च घेणे विद्यार्थ्यांसाठी भल्याचे आहे. असे मत याच विद्यालयातील बारावीच्या एका विद्यार्थ्याचे पालक शिवदत्त शेट्ये यांनी दै.'गोमन्तक' शी बोलताना व्यक्त केले.

ऑफलाईन वर्ग नियमित

डिचोलीतील या विद्यालयात गेल्या ता. 6 रोजीपासून 'एसओपी' पाळून दहावी आणि बारावीचे 'ऑफलाईन' वर्ग सुरु करण्यात आले आहेत. हे वर्ग सुरळीतपणे चालू आहेत. विद्यार्थ्यांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यापासून इयत्ता नववीचे ऑफलाईन वर्ग घेण्यात येत आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार आजपासून (सोमवारी) इयत्ता अकरावीचेही 'ऑफलाईन' वर्ग सुरु करण्यात आले आहेत. बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असली, तरी याच संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली असून, या परीक्षा मात्र 'ऑफलाईन' घेण्यात येत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT