Vishwajit Rane controversy Dainik Gomantak
गोवा

GMC Doctor Suspended: "आरोग्यमंत्री म्हणून मी हस्तक्षेप केला, माझा सूर चुकला पण माफी मागणार नाही" डॉक्टर निलंबनप्रकरणी राणेंचे स्पष्टीकरण

Goa Health Minister Vishwajit Rane: विश्वजीत राणे यांच्यावर पुढे अनेकांनी बोटं दाखवत त्यांच्या वर्तनाविरुद्ध कारवाईची मागणी केली आणि यावर आरोग्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत स्वतःची बाजू मांडली

Akshata Chhatre

पणजी: राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी (दि.७) रोजी गोवा मेडिकल कॉलेजला भेट देऊन तिथल्या कामाची तपासणी केली होती. दरम्यान कॅज्युल्टी विभागातील डॉ. रुद्रेश यांना त्यांच्या उद्धट वर्णाताणामुळे त्यांना आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ निलंबित करण्यात आलं. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर पुढे अनेकांनी बोटं दाखवत त्यांच्या वर्तनाविरुद्ध कारवाईची मागणी केली आणि यावर आरोग्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत स्वतःची बाजू मांडली आहे.

"मी जे केले ते एका असाहाय्‍य, वृद्ध महिलेसाठी केले"

ट्विट करताना आरोग्यमंत्री म्हणालेत की, "मी जे केले ते एका असाहाय्‍य, वृद्ध महिलेसाठी केले आणि मी कायम अशीच मदत करत राहीन. मी प्रत्येक रुग्णाच्या हक्कासाठी आवाज उठवणार, कृती करणार आणि लढा देणार, असे आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर म्हटले आहे.

डॉक्टर निलंबन घटनेवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे. राणे यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी बरेच काही बोलले आणि लिहिले गेले आहे. आरोग्यमंत्री म्हणून नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्‍या विशेषतः ज्येष्ठांच्‍या आरोग्याच्या गरजांबाबत कधीही उपेक्षा होऊ नये यासाठी समर्पित व्यक्ती म्हणून मला थेटपणे या विषयावर बोलणे आवश्यक वाटले."

ते पुढे असेही म्हणालेत की, "एका ज्येष्ठ नागरिकाच्या नातेवाईकाकडून मला एक संदेश प्राप्त झाला. त्या ज्‍येष्‍ठाला आधीच वेदना होत होत्या आणि डॉक्टरांनी त्यांना दररोज इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी गोमेकॉच्या कॅज्युअल्टी विभागात त्यांना ते इंजेक्शन नाकारले गेले. विशेष म्हणजे त्यावेळी रुग्णालयात फारशी गर्दीही नव्हती. तरीही माणुसकी दाखविली गेली नाही आणि हे मला अतिशय वेदनादायक वाटले."

"असा प्रकार पुन्‍हा होणार नाही पण.."

"होय, आरोग्यमंत्री म्हणून मी हस्तक्षेप केला आणि मी हे मान्य करतो की माझा सूर, भाषा अधिक सौम्य असायला हवी होती. मी ही जबाबदारी स्वीकारतो आणि खात्री देतो की, असा प्रकार पुन्‍हा होणार नाही. परंतु, एका ज्येष्ठ नागरिकास आरोग्यसेवा नाकारण्यात आली, त्याच्या संरक्षणासाठी मी उभा राहिलो. त्‍यामुळे या प्रकाराबद्दल मी माफी मागणार नाही.

डॉक्टर हे समाजात सन्माननीय असतात. गोमेकॉमधील बहुतांश डॉक्टर आपले कर्तव्य अतिशय निष्ठेने पार पाडतात. पण काही डॉक्‍टरांमुळे असे प्रसंग उद्‌भवतात. भविष्‍यात कोणत्‍याही रुग्‍णाबाबत असा प्रकार घडू नये यासाठी मला कडक पाऊल उचलणे आवश्‍‍यक होते आणि ते मी उचलले", असेही मंत्री राणे म्‍हणाले. जेव्हा सुधारणा करण्यासाठी पावले उचलली जातात, तेव्हा त्या प्रयत्नांना पाठिंबा देणेही तितकेच महत्त्वाचे असते असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT