GMC Doctor Suspended: "रुग्णांशी नीट बोला, अन्यथा घरी जा" मंत्री राणेंचा रूद्रावतार; डॉक्टराच्या निलंबनाचे दिले आदेश

Goa Health Minister Vishwajit Rane: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज शनिवारी (७ जून) गोवा मेडिकल कॉलेजला (GMC) अचानक भेट देऊन रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्धल माहिती घेतली.
Goa Health Minister Vishwajit Rane
Goa Health Minister Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज शनिवारी (७ जून) गोवा मेडिकल कॉलेजला (Goa Medical College and Hospital) अचानक भेट देऊन रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्धल माहिती घेतली. त्यांच्या या भेटीदरम्यान कॅज्युल्टी विभागातील डॉक्टर रुद्रेश यांच्या उद्धट वर्तनाबद्दल तत्काळ निलंबनाचा आदेश देण्यात आला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी GMC ला भेट देत कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्धल माहिती घेतली. या वेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत कर्मचाऱ्यांना सांगितलं की, "रुग्णांशी नीट बोला आणि व्यवस्थित वागा, अन्यथा घरी चला."

GMCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रुद्रेश यांच्या उद्धट आणि असभ्य वर्तनाविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबतच्या चौकशीनंतरच आरोग्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं समजतं.

Goa Health Minister Vishwajit Rane
Goa: गोव्यासाठी धोक्याची घंटा! वनक्षेत्र, मत्‍स्‍योत्‍पादनात होतेय घट; ‘केंद्रीय सांख्यिकी’च्या अहवालातून धक्कादायक खुलासा

याआधी (२४ मे) आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघड झाल्याचे जाहीर केले होते. याआधी आरोग्य विभागातील ६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. यात २ आरोग्य निरीक्षक आणि ४ स्वच्छता निरीक्षकांचा समावेश होता.

या कर्मचाऱ्यांवर नागरिकांना ब्लॅकमेल करणे, भ्रष्ट वर्तन आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्रालयाने कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Goa Health Minister Vishwajit Rane
Goa Crime: कळंगुटमध्ये पर्यटकांचा हल्ला, विजेच्या खांबावर आपटले डोके; ओळख न पटविल्याने खूनप्रकरणी 15 संशयित निर्दोष

आरोग्यमंत्री राणे यांनी यापूर्वीही अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की, राज्यातील आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी कुठल्याही प्रकारच्या हलगर्जीपणाला किंवा उद्धट वागणुकीला थारा दिला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com