GMC Resident Doctors: गोमेकॉच्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडलं गाह्राण; वेतनवाढीच्या प्रस्तावावर दाखवली सकारात्मकता!

Health Minister Vishwajit Rane: गोवा निवासी डॉक्टर संघटनेच्या समिती स्थापन कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी डॉक्टरांच्या अनेक समस्या मांडल्या.
GMC Resident Doctors: गोमेकॉच्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडलं गाह्राण; वेतनवाढीच्या प्रस्तावावर दाखवली सकारात्मकता!
Health Minister Vishwajit Rane:Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा निवासी डॉक्टर संघटनेच्या समिती स्थापन कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी डॉक्टरांच्या अनेक समस्या मांडल्या. निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात 30 हजार रुपयांनी वाढ करण्याची विनंती त्यांनी केली.

यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याची दखल आरोग्य मंत्री विश्वजीत राणे घेतली असून वेतनवाढीचा प्रस्ताव तयार करुन लवकर पाठवावा, असे आदेश त्यांनी गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांना दिले.

मंत्री राणे म्हणाले की, डॉक्टरांच्या (Doctors) विविध समस्या असतात. मी त्यावर बोलू शकत नाही. मात्र, त्यावर बोलण्याचा अधिकार सर्व डॉक्टरांना आहे. समस्या आमच्या लक्षात आणून दिल्या तर त्यांचे निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करु. या क्षेत्रात कुठलीच गोष्ट 100 टक्के होत नसते; पण ती 100 टक्के करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. म्हणूनच जेव्हा डॉक्टरांनी आंदोलन केले, तेव्हा मी कुणालाही रोखले नाही. तो त्यांचा अधिकार आणि तो मला हिरावून घ्यायचा नाही, असेही मंत्री राणे म्हणाले.

GMC Resident Doctors: गोमेकॉच्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडलं गाह्राण; वेतनवाढीच्या प्रस्तावावर दाखवली सकारात्मकता!
Minister Vishwajit Rane Helps Woman : परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं केलं, पण मंत्री राणेंनी सावरलं; स्वखर्चाने महिलेला देणार घर बांधून!

वाहतुकीसाठी 6 नवी वाहने

डॉक्टरांना ये-जा करण्या साठी वाहनांची आवश्यकता आहे. मात्र, आम्ही भाड्याने वाहन घेऊ शकत नाही. तसे केले तर आणखी काही समस्या उदभवू शकतात. त्यामुळे ‘सीएसआर’अंतर्गत नवी 6 वाहने घेण्याची योजना आम्ही आखली आहे. लवकरच ती पूर्ण होईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

GMC Resident Doctors: गोमेकॉच्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडलं गाह्राण; वेतनवाढीच्या प्रस्तावावर दाखवली सकारात्मकता!
Vishwajit Rane: नगरपालिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खास विधेयक मांडणार; नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे

नवे हॉस्टेल उभारणार

डीन शिवानंद बांदेकर म्हणाले की, निवासी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत. डॉक्टरांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देत आहोत तसेच गोमेकॉ परिसरातील पथदीप देखील रोज सुरू असतील, याची दक्षता घेतो. नवीन हॉस्टेल बांधण्याची मागणी करण्यापूर्वीच आम्ही विद्यमान हॉस्टेलचे लेखापरीक्षण करण्यासाठी विशेष समितीही स्थापन केली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार नवीन हॉस्टेल उभारण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com