Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Goa Employment: कलाकारांनाही सरकारी नोकऱ्या द्या; युरी आलेमाव यांची मागणी

सांस्कृतिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स द्यावेत

दैनिक गोमन्तक

Goa Employment: ‘कलाकारांची खाण’ अशी प्रसिद्धी असलेल्या गोव्याने जगाला अनेक रत्ने दिली. सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सरकारने सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना राज्याच्या सांस्कृतिक धोरणानुसार ग्रेस मार्क्स द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील सुवर्णपदक विजेत्यांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे मी स्वागत करतो. मात्र सरकारने सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे आलेमाव म्हणाले. गोव्याने अनेक दिग्गज कलाकार जगाला दिलेले आहेत. कलांच्‍या विविध प्रकारांमध्ये आम्ही कलारत्नांची निर्मिती केली आहे, असेही ते म्‍हणाले.

मुख्‍यमंत्र्यांना लवकरच लिहिणार पत्र

काँग्रेस सरकारने आणलेल्या राज्य सांस्कृतिक धोरणाची अद्यापही कला आणि संस्कृती खात्याने पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही हे दुर्दैवी आहे. धोरणाअंतर्गत सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात यावेत, असे आलेमाव यांनी नमूद केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून क्रीडापटूंसाठी जाहीर केलेली सरकारी नोकऱ्या देण्याची योजना सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्यांनाही देण्याची विनंती करणार आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.

कला आणि संस्कृती खात्याने नियुक्त केलेल्या संगीत आणि नृत्य प्रशिक्षकांना मूल्यमापनावर आधारित बढती देण्यात यावी, ज्यामुळे त्यांना चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आणि विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात मदत होईल. सध्याच्या नियमांनुसार संगीत आणि नृत्य प्रशिक्षक कोणत्याही प्रमोशनसाठी पात्र नाहीत. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025 Final: फातोर्ड्यात रंगणार महामुकाबला! FC गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान; सलग दुसऱ्यांदा सुपर कप राखण्याची संधी

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा सलग तिसरा विजय! जम्मू काश्मीरला पाजले पाणी; सुयश, कश्यपची मॅचविनिंग खेळी

Alphanso Mango Controversy: हापूस कोकणी की गुजराथी? वाद पेटला; 'वलसाड हापूस' GI मानांकनाची गुजरातची मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोज माघार घेणार?

Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये अग्नितांडव! PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT