54 IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

54 IFFI Goa: ‘सुवर्ण मयूर’साठी नामांकन मिळणेच मोठे; ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी

54 IFFI Goa: गोव्यात केले दोन चित्रपटांचे चित्रिकरण

दैनिक गोमन्तक

गंगाराम आवणे

54 IFFI Goa: गेल्या वर्षी ‘कांतारा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इफ्फीत अतिथी म्हणून आलो होतो. यंदा इफ्फीत या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम 15 चित्रपटांमध्ये ‘सुवर्ण मयूर’साठी नामांकन मिळाले. जगभरातील महत्त्वपूर्ण चित्रपट या स्पर्धेत असतात. यात ‘कांतारा’ला स्थान मिळणे हीच माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी सांगितले. ते पत्र सूचना कार्यालयात माध्यमांशी संवाद साधत होते.

मी केवळ माझ्या प्रेक्षकांना भावणारे, आवडणारे चित्रपट कसे देता येतील याकडेच लक्ष देतो. मी ‘कांतारा’ला इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान प्राप्त होईल, असा कधीच विचार केला नव्हता, असे ऋषभ यांनी सांगितले. भारतात लोककला, लोकसंस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत, त्यामुळे लोकप्रथांवर आधारित चित्रपट भारतीयांना आपलेसे वाटतात ते त्यांना भावतात.

‘कांतारा’ चित्रपटात निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्ष रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण करताना जेवढी काळजी घ्यायला हवी तेवढी घेत अतिशय भक्तिभावने साकारला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मी आतापर्यंत दोनदा गोव्यात आलो आहे. दोनदा इफ्फीसाठी तर दोनदा चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी गोव्यात आलोय. त्या दोन चित्रपटांतील एका चित्रपटाचे दिग्दर्शन मी केले आहे तर एका चित्रपटाच्या गाण्याचे चित्रिकरण केले आहे. त्यावेळी बजेट कमी असल्याने काही चित्रिकरण परवानगीशिवाय केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

कुंदापूरसारख्या गावातून बंगळुरूला जाऊन चित्रपट बनवायचे स्वप्न असाध्य वाटत होते; परंतु ते साध्य झाले. लहानपणी मी माझ्या गावात ज्या प्रथा-परंपरा पाहिल्या, जे जीवन अनुभवले तेच ‘कांतारा’ चित्रपटात चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या खडतर काळात बंगळुरूला होणाऱ्या चित्रपट महोत्सवात मी स्वयंसेवक म्हणून काम करायचो. त्यावेळी तेथे अनेक चित्रपट पहायला मिळायचे. तो महोत्सव माझ्यासाठी शिकण्याची शाळा होती.
- ऋषभ शेट्टी, अभिनेता, दिग्दर्शक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT