Goa Accident: मुंबईचे कुटुंब बचावले; पण कारचालक दगावला

Goa Accident: वाहन थेट नदीत : सारमानस फेरी धक्क्यावर दुर्घटना: पती-पत्नी आणि मुलगा बचावला
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: सारमानस फेरी धक्क्यावरून कार थेट नदीपात्रात गेल्याने कारचालकाचा गाडीत गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मुंबईतील एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह मुलगा मिळून तिघांची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कारचालकाचे नाव यतीन मयेकर (वय ३०) असे असून, तो डिचोलीतील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

Goa Accident
Petroleum Reserves: चिखलीतील सहा विहिरींत पेट्रोलजन्य साठा!

या दुर्घटनेत मुंबईतील अमित कोरगावकर (वय ४५) यांच्यासह त्यांची पत्नी यशश्री आणि बारा वर्षीय मुलगा अयीन सुदैवाने बचावला. ही दुर्घटना आज (मंगळवारी) सायंकाळी सारमानस फेरी धक्क्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील अमित कोरगावकर हे पत्नी आणि मुलासह जीए-०१-६/डी-९४७२ या क्रमांकाच्या भाड्याच्या कारने सारमानसमार्गे रेल्वे पकडण्यासाठी करमळी रेल्वे स्टेशनकडे जात होते.

सारमानस धक्क्यावर ही दुर्घटना घडली. यावेळी धक्क्यावर फेरीबोट नव्हती, म्हणून धक्क्याच्या बाजूला कार उभी करत असतानाच ती अचानक उतरणीवरून नदीत गेली.

Goa Accident
Goa IFFI 54th: ‘सुवर्ण मयूर’ चा मानकरी आज ठरणार

डिचोली अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती मिळताच उपअधिकारी शिवाजी नाईक आणि लिडींग फायर फायटर विठ्ठल गावकर, नामदेव तारी यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गौरेश मांद्रेकर, गीतेश नाईक, राकेश मातोणकर, लवशीन पिल्लई, विशांत वायंगणकर, विष्णू राणे, महेश देसाई आणि महेश नाईक या जवानांनी मदतकार्य करून स्थानिकांच्या मदतीने कार पाण्यातून बाहेर काढली. डिचोली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी डिचोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

जीवाच्या आकांताने ते ओरडले

कार सारमानस फेरी धक्क्याच्या दिशेने जात असता, उतरणीवरून ती थेट नदीत गेली. यावेळी जीव वाचविण्यासाठी कारमध्ये अडकलेल्यांनी आरडाओरडा केला. तेथील लोकांनी प्रसंगावधान राखून कारमधील सर्वांना सुखरूप बाहेर काढले. कारमध्ये अडकलेला चालक यतीन हा अस्वस्थ असल्याने त्याला डिचोलीच्या आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com