MLA Nilesh Rane Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: 'कामाला गती द्या'; आमदार निलेश राणेंनी घेतला मुंबई - गोवा महामार्गाचा आढावा

Mumbai Goa Highway Update: महामार्गाची रखडलेली काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना आमदार राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांना दिल्या.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

चिपळूण: मुंबई - गोवा महार्गाच्या कामाला गती द्या तसेच, काम लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार राणे चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी महामार्गाच्या कामाच्या आढावा घेतला.

मुंबई - गोवा महार्मागाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रखडले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने महामार्गाबाबत वारंवार नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गाची रखडलेली काम लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या.

डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला आणि खुणेकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. यावेळी स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती.

मंत्री भोसले यांनी २०११ साली सुरु झालेल्या महामार्गाचे काम पूर्ण व्हायला विलंब झाल्याचे मान्य करत कोकणासाठी हा महामार्ग अत्यंत महत्वाचा असल्याचे म्हटले होते. चिपळूण मधील पुलाचे काम देखील ५० टक्के पूर्ण झाल्याचे मंत्री भोसले यांनी सभागृहात सांगितले होते. संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर २०२५ नाही पण जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेप्रकरणी 13 जणांवर तब्बल 4,150 पानांचे दोषारोपपत्र; 305 साक्षीदारांचे नोंदवले जबाब

History: पोर्तुगीजांचे षड्यंत्र अन् शिवरायांचा गनिमी कावा; गोव्याचा 'भारतीय चेहरा' जपण्यासाठी दिलेला ऐतिहासिक लढा

'तारीख पे तारीख' आता पुरे! भारतीय न्यायव्यवस्थेला 'सिंगापूर पॅटर्न'ची गरज का?- संपादकीय

Shigmo Festival Goa: काणकोणात पारंपरिक शिमगोत्सवास दिमाखात प्रारंभ, लोलयेतील सहा मेळांकडून जल्लोष; माजाळी येथील कलाकारांवर मेळांची भिस्त

फातोर्डा येथील 'साबांखा'च्या जागेत अजगरांचा धुमाकूळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT