पर्ये : गोव्याच्या सीमेलगत असलेल्या विर्डी-दोडामार्ग येथे एक गवा मृतावस्थेत आढळल्याने शंका-कुशंकांना ऊत आला आहे. केरी-शिरोलीजवळच्या सीमेलगत विर्डीतील ‘पालसकल’ या भागात रस्त्यावर आज मृत गवा आढळला. दोन गव्यांमध्ये झालेल्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला असावा. यापूर्वी मांस आणि शिंगाची तस्करी करण्यासाठी गव्यांची शिकार करण्याची प्रकरणे समोर आली होती. (Gaur Found Dead near Goa Border News Updates)
दरम्यान, या घटनेची माहिती सावंतवाडी-दोडामार्ग वनविभागाचे उपवनपाल शहाजी नरवर यांना देण्यात आली. त्यानंतर वन (Forest) खात्याने पाहणी करून मृत गव्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. दोडामार्ग तालुक्यातील विर्डी भाग हा जंगली प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा भाग असलेले तेथील जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आलेले आहे.
2012 पासून मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) या भागावर पर्यावरणीय संवेदनशीलच्या दृष्टीने विविध निर्बंध जारी केले असले तरी प्रत्यक्षात मात्र येथे बेसुमार जंगलतोड, दगड आणि चिऱ्यांच्या खाणींचे प्रस्थ आहे. त्यामुळे इथल्या वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झालेला आहे. इथल्या डोंगरउतारावर बागायती पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड दिसून येते. तसेच खासगी फार्महाऊसची संख्याही या वाढत आहे. त्यामुळे जंगली श्वापदांचे (Wildlife) जीवन संकटात सापडले आहे. दरम्यान गवा भरस्त्यावर मृत सापडल्यामुळे विर्डी आणि परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.