Baina Gate Dispute Dainik Gomantak
गोवा

Mormugao: फाटक नेमके कुणासाठी? बायणा उड्डाण पुलाखालील गेटचा वाद मिटेना; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Mormugao Port Gate: बायणा येथील उड्डाण पुलाखालील रस्त्यावर मोठे लोखंडी फाटक उभारल्याप्रकरणी सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही.

Sameer Panditrao

Vasco Gate Below Cable Stayed Flyover Bridge

वास्को: बायणा येथील उड्डाण पुलाखालील रस्त्यावर मोठे लोखंडी फाटक उभारल्याप्रकरणी सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोणता निर्णय घेतात याची आम्ही प्रतीक्षा करीत असल्याचे नगरसेवक दीपक नाईक यांनी सांगितले. या फाटकासंबंधी घेण्यात येणाऱ्या निर्णयानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू, असे ते म्हणाले.

बायणा ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या केबल स्टेड तथा उड्डाण पुलावरून बायणा येथे उतरण्यासाठी रॅम्प उभारण्यात आला आहे. या रॅम्पवरून खाली उतरून तेथील रस्त्यावरून बायणा, मांगोरहिल भागात जाता येते. या पुलाचे उद्‍घाटन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मुरगाव बंदर प्राधिकरणाने पुलाखालील रस्त्याच्या एक्झिट भागात सिमेंट चिऱ्यांनी कुंपण उभारून तेथे मोठे लोखंडी फाटक उभारले आहे.

यावरून तेथे वाद पेटला आहे. दरम्यान, या फाटकासंबंधी विचारणा केल्यावर प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांचा अपमान केला. त्यामुळे त्या वादात ठिणगी पडली आहे. त्या अधिकाऱ्याने नगराध्यक्षांची माफी मागावी, अशी मागणी झाली आहे.

उड्डाण पूल एका संस्थेच्या वापरासाठी नव्हे : साळकर

याप्रकरणी आमदार कृष्णा साळकर यांनीही दखल घेतली आहे. नगराध्यक्ष बोरकर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत, त्यांचा मान ठेवण्याची गरज आहे. तथापि, मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अधिकारी त्यांना मान देणार नसतील, तर आम्हालाही त्यांना मान देण्याची गरज नसल्याचे साळकर म्हणाले. उद्‍घाटनाच्या दिवशी जर या फाटकसंबंधी विचार व्यक्त केले असते तर ठीक झाले असते. परंतु प्राधिकरण असे वागेल हा विचार मनात आला नव्हता. आम्ही गप्प बसणार नाही. उड्डाणपूल हा लोकांच्याही सोयीसाठी बांधला आहे. तो सर्वांसाठी खुला असणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना जे पाहिजे ते आम्ही लोकांना देणार आहोत. एवढे पैसे या पुलावर खर्च केले ते फक्त एका संस्थेच्या वापरासाठी नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरण म्हणते, सुरक्षिततेसाठी फाटक

मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांनी या फाटकासंबंधी प्राधिकरणाची बाजू स्पष्ट केली आहे. ते फाटक सुरक्षिततेच्या द्दष्टीने उभारण्यात आले आहे, ते कोणासाठीही बंद करण्यात आले नाही. तेथे कोणावरही निर्बंध घालण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले होते. तथापि, आज खुले ठेवण्यात येणारे फाटक भविष्यात कधी बंद करण्यात येईल हे सांगता येत नाही अशी भीती येथे व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्या फाटकसंबंधी संबंधितांना योग्य निर्णय घेण्याची गरज भासणार आहे. भविष्यात तेथे सुरक्षा रक्षक उभे केले तर काय करणार असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT