Mormugao: मुरगाव नगराध्यक्षांच्या विधानाने उसळला वाद ! मासळी विक्रेत्यांनी घातली हुज्जत; विपर्यास केल्याचा दावा

Mormugao Fish Market Dispute: मुरगाव पालिका मंडळाची मंगळवारी बैठक होती. त्यावेळी मासे विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून बैठकीकडे मोर्चा वळविला.
Mormugao Mayor Girish Borkar fish market inspection controversy
Fish market inspection MormugaoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: येथील मासळी मार्केटाची पाहणी करताना मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी मासे विक्रेत्यांसंबंधी केलेल्या एका वक्त्तव्यामुळे संतापलेल्या मासळी विक्रेत्यांनी मंगळवारी नगराध्यक्षांशी हुज्जत घातली. तथापि आपल्याला जे काही म्हणावयाचे होते. त्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे सांगून बोरकर यांनी त्यांची समजूत काढली.

मुरगाव पालिका मंडळाची मंगळवारी बैठक होती. त्यावेळी मासे विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून बैठकीकडे मोर्चा वळविला. सुमारे दोन तास त्यांनी तेथे ठाण मांडले. याप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिलाल्याने तेथे पोलिस तैनात करण्यात आले.

त्यानंतर बैठक संपल्याबरोबर त्यांनी नगराध्यक्षांवर प्रश्नांचा मारा केला. नव्या मासळी मार्केटात व्यवसाय करावयाचा नसेल, तर त्या मासे विक्रेत्यांनी घरी जावे, असे वक्त्तव्य कोणत्या आधारावर केल्याचे त्यांनी विचारले. ते मार्केट आमचे आहे, आम्ही जो निर्णय घेऊ तो अंतिम असेल, असे त्या विक्रेत्यांनी सांगितले. बोरकर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि त्या मासळी विक्रेत्या ऐकून घेण्याचा मनस्थितीत नव्हत्या.

आम्हाला चांगले मासे मार्केट बांधून दिल्याबद्दल आम्ही वास्कोचे आमदार साळकर यांचे आभारी आहोत. तथापि सामंजस्य करारानुसार तेथे पूर्वी असलेले वालंकिणी चॅपेल बांधून देण्याची गरज आहे. त्यासाठी आपणास योग्य आर्किटेक्ट शोधण्याची सूचना साळकर यांनी केली होती.

त्यासाठी आर्किटेक्ट शोधण्यात येत आहे. करारामध्ये त्या नवीन मार्केटात हॉल असेल, असे कोठेच नमूद करण्यात आले नव्हते. मुरगाव पालिका महसुलासाठी तेथे हॉल बांधत आहे. त्याला आम्ही हरकत घेतली नाही. तथापि करारामध्ये जे मुद्दे आहेत,त्याची कार्यवाही संबंधितांनी करणे गरजेचे आहे, असे मत क्रिस्तोडियो डिसौझा यांनी व्यक्त केले.

Mormugao Mayor Girish Borkar fish market inspection controversy
Mormugao: 14 कोटी खर्चून नूतनीकरण! उदघाटन कधी? मुरगाव पालिकेच्या इमारतीवरून चर्चांना उधाण

पालिका सोपो घेते; कचरा उचलत नाही!

मुरगाव पालिका आमच्याकडून सोपो गोळा करते, परंतु मासे मार्केटातील कचरा उचलत नाही, की तेथील घाण स्वच्छ करीत नाही. ज्याअर्थी पालिका सोपो गोळा करते, त्याअर्थी तेथे स्वच्छता ठेवणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले.

Mormugao Mayor Girish Borkar fish market inspection controversy
Mormugao: ‘सीसीटीव्‍ही'ची दहशत! मुरगाव चिकन मार्केटलगत कचराफेकूंचे प्रमाण घटले; ‘गोवा बागायतदार’जवळ मात्र 'जैसे थे' अवस्था

आपल्या म्हणण्याचा झालाय विपर्यास!

आपणास जे काही म्हणावयाचे होते. त्याचा विपर्यास झाला आहे. तेथे २५० मासे विक्रेत्यांसाठी जागा आहे. तेथे एखादी विक्रेती मासे विक्री बसली नाही. तर ती जागा आम्ही दुसऱ्याला देणार आहोत. कारण मुरगाव पालिकेला महसूल पाहिजे. ती जागा रिकामी राहिल्यास महसूल बुडण्याची शक्यता आहे, असे स्पष्टीकरण बोरकर यांनी दिले. त्यानंतर क्रिस्तोडियो डिसौझा यांनी सदर प्रकरणी हस्तक्षेप करून वातावरण थंड केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com