Goa Fire Cases बस्तोडा- म्हापसा सर्व्हिस रोडनजीक टाकलेल्या कचऱ्याला आज (दि. 07 जून) भीषण आग लागली असून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. दुपारच्या वेळेला लागलेल्या या आगीमुळे पणजी-म्हापसा महामार्गावर धुराचे लोट पसरले होते.
या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेला असून या कचऱ्याच्या ढिगांना दुपारच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून महामार्गावर पसरणाऱ्या धुरामुळे अपघात घडू नये यासाठी देखील अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पालिकेने या रस्त्यानजीक कचरा टाकणाऱ्या बऱ्याच जणांवर कारवाई केली होती. तसेच म्हापसा पालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांशेजारी रात्रीच्या वेळी कचरा फेकणाऱ्यांवर कोम्बिंग ऑपरेशन केले होते.
या महामार्गालगत बांधकामाचे खराब साहित्य टाकणाऱ्या दोन ट्रकांवर देखील पालिकेने कारवाई करत हे दोन्ही ट्रक जप्त केले होते. या ट्रक चालकांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.
बार्देशचे मामलेदार प्रवीण गावस यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या ट्रकना डेब्रिस टाकताना पकडले होते. ग्रीनपार्क ते तार जंक्शन मार्गावर सर्व्हिस रोडलगत हा प्रकार सुरू होता. दरम्यान आज सर्व्हिस रोडनजीक लागलेल्या आगी संबंधी सावितर माहिती प्राप्त झाली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.