Ghodemodni Bicholim Dainik Gomantak
गोवा

Video: 'घणचे कटर घण'चा जल्लोष! पहा डिचोलीतील 'घोडेमोडणी'तील घोडेनृत्याचे खास व्हिडीओ

Ghodemodni Bicholim: गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ देवस्थानची ''घोडेमोडणी'' शुक्रवारी (ता.६) सायंकाळी प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या ''घणचे कटर घण''च्या तालावर गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ देवस्थानची ''घोडेमोडणी'' शुक्रवारी (ता.६) सायंकाळी प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.

घोडेमोडणी ही गावकरवाडा येथील शिगमोत्सवाचे खास आकर्षण. घोडेमोडणीनिमित्त सायंकाळी शहरात जल्लोष पसरला होता. परंपरेप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी चार घोडेस्वार सजविल्यानंतर गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानकडून ढोल-ताशांच्या तालावर "घोडेमोडणी"ला सुरवात झाली.

गाऱ्हाणे घातल्यानंतर ढोल-ताशांच्या ठेक्यावर घोडेस्वारांनी ताल धरला. सुरवातीस आतीलपेठ येथे तीन आणि नंतर गावकरवाडा येथील श्री रवळनाथ मंदिर परिसरात पाच फेरे मारल्यानंतर पारंपरिक पद्धतीने घोडेमोडणीची सांगता झाली. घोडेमोडणीचा आस्वाद घेण्यासाठी गावकरवाडा ते कायरो हॉस्पिटल जंक्शनपर्यंत नागरिकांनी गर्दी होती.

१८ रोजी धुळवड

दरम्यान, गावकरवाडा श्री शांतादुर्गा रवळनाथ देवस्थानचा शिगमोत्सव परंपरेप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात येत आहे. येत्या ता. १८ रोजी धुळवड साजरी करण्यात येणार आहे. तर २३ रोजी कळसोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गावाकरवाडा येथील शिगमोत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT