

Gangotri Highway Accident Video: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. डबराणीच्या दिशेने जात असलेली एक अनियंत्रित कार गंगनानी धर्मकुंडपासून अवघ्या 20 मीटर अंतरावर थेट नदीत कोसळली. या वेदनादायी अपघातात आतापर्यंत नदी किनारी चार जणांचे मृतदेह आढळून आले असून, वाहनात आणखी काही प्रवासी असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासन, गंगानी पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक आणि पोलिसांनी दुर्गम व कठीण परिस्थितीत नदीच्या पात्रात उतरुन एका गंभीर जखमी प्रवाशाला सुरक्षितरित्या बाहेर काढले असून, त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक अंदाजानुसार, कारमधील दोन प्रवासी नदीच्या पाण्याच्या प्रचंड वेगात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलीस आणि अनुभवी गोताखोर नदीच्या आसपासच्या परिसरात त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक सर्च ऑपरेशन राबवत आहेत.
प्रशासकीय स्तरावर या संपूर्ण बचावकार्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि वैद्यकीय पथकांना पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवण्यात आले. कोणत्याही प्रकारचा ढिलाईपणा न दाखवता मदतकार्य वेगाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सध्या पोलीस यंत्रणा या अपघातामागील (Accident) नेमक्या कारणांचा सखोल तपास करत असून, मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे काम वेगाने सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.