Goa Shigmotsav: यंदापासून वाळपईचा शिमगोत्सव सात दिवसांचा! वाळपई मासोर्डेची आज घोडेमोडणी; रात्रीपासून करवल्या उत्सवास प्रारंभ

Goa Shigmotsav 2026: वाळपई शहरातील प्रमुख शिमगोत्सव यावर्षीपासून सात दिवस साजरा केला जाणार आहे.
Goa Shigmotsav
Goa ShigmotsavDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: वाळपई शहरातील प्रमुख शिमगोत्सव यावर्षीपासून सात दिवस साजरा केला जाणार आहे. वाढती घरांची संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाळपईचा शिगमा मासोर्डे गावातून सुरुवात झाली आहे. मासोर्डे हे प्रमुख गाव शिगमोत्सवासाठी वाळपईत प्रसिध्द आहे. करवल्या उत्सवात घरोघरी फिरताना बराच वेळ लागतो, घरांची संख्याही वाढत असल्याने सहा दिवसांत शिमगा करणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदापासून एक दिवस वाढवून सात दिवसांचा केला आहे.

सोमवारपासून वाळपई मासोर्डेच्या शिगम्याला होळी खेळून सुरुवात झाली आहे. काल चोर खेळ खेळण्यात आला. वाळपई मासोर्डेची वार्षिक घोडेमोडणी चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. मासोर्डे येथे शांतादुर्गा देवस्थानातून सुरुवात केली जाणार आहे.

Goa Shigmotsav
Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

मासोर्डे येथे शांतादुर्गा महादेव देवस्थानात सर्वांत प्रथम दोन घोडे स्वारांना सजवून त्यांची मनोभावे पूजा करण्यात येते. त्यांच्यासोबत दोन करवल्याही तयार केल्या जातात. मंदिरात सार्वजनिक सांगणे करून घोेडेमोडणीला प्रारंभ करण्यात येतो.

Goa Shigmotsav
Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

त्यातील एक घोडेस्वार पोलिस स्थानक मार्गाने व दुसरा घोडेस्वार वाळपई शहर मार्गाने मार्गस्थ होतो. व दोघे घोडेस्वार वाळपई पोलिस स्थानका जवळ एकत्र येतात. तिथे पोलिसांची घोड्यांना मानवंदना दिली जाईल. तिथून पुन्हा घोडेमोडणीला सुरुवात होईल. प्रत्येक घरातील नागरिकांकडून या दोन्ही घोड्यांची पूजा केली जाईल.

मासोर्डेची घोडेमोडणी गावची शान!

नागरिक म्हाळू गावस म्हणाले, आमच्या पूर्वजांनी मासोर्डे गावात दोन घोड्यांची घोडेमोडणी परंपरा सुुरू करुन दिली होती. ती आजही जपली आहे. मासोर्डे गावची घोडेमोडणी मासोर्डे तसेच वाळपई शहराची शान आहे.

मासोर्डे गावातून उत्सवाला सुरुवात होऊन वाळपई शहरात ढोल ताशांच्या गजरात घोडे मोडणी केली जाते. ती देखणी असते. तरुणाईनेदेखील ही परंपरा संवर्धित केली आहे. शिगमोत्सवात त्यामुळे गावात आनंददायी वातावरण असते. वाळपई, मासोर्डे गावात सुमारे दोनशेंहून अधिक घरात करवल्यांचे पूजन होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com