Goa Ganesh Idol Making Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idols: .. लागलीसे आस! गोव्यात चित्रशाळांमध्ये लगबग सुरु; गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला प्रारंभ

Ganpati Idol Making Goa: जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या कामाला प्रारंभ केला जातो.

Sameer Panditrao

बोरी: गणपती उत्सवाला अद्याप तीन महिने बाकी असले तरी देऊळवाडा-बोरी येथील स्व. सुमंत बोरकर यांच्या गणपती चित्रशाळेत चिकणमातीपासून गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने यंदा मे महिन्यातच जोर धरल्यामुळे सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या कामाला प्रारंभ केला जातो.

परंतु स्व. सुमंत बोरकर यांच्या दोन पुत्रांनी आपला वडिलोपार्जित गणपती मूर्ती बनविण्याचा उद्योग जोपासला असून पेडणे किंवा सांगे भागातून भाड्याच्या गाडीने चिकणमाती विकत आणली जाते. आता पावसाने जोर धरलेला असल्याने चिकणमातीपासून मूर्ती बनविण्यास ललवकर सुरुवात झालेली आहे. लहान-मोठ्या मध्यम आकाराच्या मूर्ती ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बनवून देण्याचे काम होते.

माफक दरात गणेशमूर्ती

दिवसेंदिवस रंगरंगोटी, मातीचे दर तसेच मजुरीचे दर गगनाला भिडत असले तरी त्यावर मात करून बोरकर बंधूंनी आपल्या ग्राहकांना माफक दरात गणपती मूर्ती देण्याचे ठरविले आहे. त्यांच्याकडून मूर्ती बनवून घेण्यासाठी बोरीबरोबरच शेजारच्या गावातील आणि शहरातील लोकही येत आहेत, असे बोरकर बंधूनी सांगितले. आपला कामधंदा सांभाळून हे बोरकर बंधू गणपतीच्या मूर्ती बनवून ग्राहकांना देतात, हे विशेष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT