Goa Marathi Academy: मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे रसिकांना दर्शन घडवावे, या हेतूने गोवा मराठी अकादमीने ‘खरा तो प्रेमा’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात गोवा मराठी अकादमीच्या सौजन्याने हा कार्यक्रम सादर होणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वरूप सवेश, साभिनय नाट्यगीतांचे सादरीकरण असे आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात वेगवेगळ्या युवा कलाकारांना संधी दिली आहे. त्यात भक्ती धुपकर, श्रुती सालेलकर, गायत्री पाटील, सुरज शेटगावकर, दशरथ नाईक, गौरांग भांडिये, चिन्मयी कामत, युगा सांबारी, ईशा घाटे, हृषीकेश ढवळीकर, सिद्धी पार्सेकर, शारदा शेटकर,अनुष्का साळगावकर थळी यांचा समावेश आहे. नेहा उपाध्ये या निवेदन करणार आहेत.
* सादरीकरणाचे वेळापत्रक-
दि. 3 रात्री 7.30 वा. विठ्ठलापूर-कारापूर सार्वजनिक गणेशोत्सव
दि. 4 रोजी सायं. 4 वा. शिरोडा सार्वजनिक गणेशोत्सव
दि. 5 रोजी सायं. 7 वा. डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव
दि. 6 रोजी संध्याकाळी 4 वा. आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव
दि. 7 रोजी सायं. 7 वा. वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव
दि. 8 रोजी सायं. 5.30 वा. कोरगाव सार्वजनिक गणेशोत्सव व रात्री 9 वा. मांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव येथे हा कार्यक्रम सादर होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.