Gandhi Market Dainik Gomantak
गोवा

गांधी मार्केट गैरप्रकार वृत्ताची दखल; मुख्याधिकाऱ्यांनी मागवला अहवाल

गांधी मार्केट संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिकेच्या मालकीच्या गांधी मार्केट मध्ये चाललेले गैरप्रकार व त्यामुळे पालिकेला सोसावा लागणारा मोठ्या प्रमाणातील तोटा, या वृत्ताची गंभीर दखल पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी घेतली व संबंधित विभागप्रमुखाला गांधी मार्केट संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.

स्वतः फर्नांडिस यांनी सांगितले की, अहवाल हाती येताच संबंधित अधिकारी, मार्केट निरिक्षक, लेखा अधिकारी यांना घेऊन आपण गांधी मार्केटात जाऊन एकंदर स्थितीचा आढावा घेणार तसेच दुकानांच्या कागदपत्रांची पहाणी करणार आहे.

आठवडाभरापूर्वी हे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यात नगरपालिका गांधी मार्केटची देखभाल व अन्य व्यवस्थेवर महिनाकांठी 78 लाख खर्च करते पण त्यांतून तिला एक दशांशही महसूल मिळत तर नाहीच पण तेथे जाणा-या लोकांचीही प्रत्येक बाबतीत गैरसोय होते, असे वृत्तात म्हटले होते. यावेळीही अनेकदा पालिका बैठकीत या मार्केटमधील गैरप्रकारांचा मुद्दा पालिका बैठकीत गाजल्या नंतर 2016 मध्ये त्याचे सर्वेक्षण केले गेले होते. त्यात पालिका तेथे 6 लाख खर्च करते तर तिला तेथील 153 दुकानांतून 2-3 लाख रू. महसूल मिळतो, असे म्हटले होते.

तेथील एकही दुकान मूळ भाडेकरूकडे नाही तर त्याचे अनेकदा हस्तांतरण झालेले आहे, पोटभाडेकरूंकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. या प्रकारांतून भलतेच लोक गब्बर झालेले आहेत तर पालिकेला कसलाच लाभ झालेला नाही, या बाबीही सदर सर्वेक्षण अहवालांत होत्या. पालिकेने सदर अहवाल स्वीकारला व ठेवून दिला. त्या मागे पालिकेंतील अधिकारी तसेच राजकारणी असल्याचे आरोप त्यावेळी झाले होते.

आता मुख्याधिका-यांनी यात लक्ष घातले असून त्यांनी आपण स्वतः तेथे जाऊन खात्री करणार असल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

SCROLL FOR NEXT