सायबर गुन्हेगारांनी गोव्यातील व्यक्तीला घातला 6 लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि पैसे ट्रान्सफर केले.
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोबाईल सिम डेटा अपडेट करण्याचे कारण पुढे करत सायबर गुन्हेगारांनी गोव्यातील रायबंदर येथील व्यक्तीला 6 लाख रुपयांचा गंडा घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराला 'रिमोट ऍक्सेस अ‍ॅप्लिकेशन' डाउनलोड करायला लावले.

Cyber Crime
Goa Panchayat Election: राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार पंचायत निवडणुका

या अ‍ॅप्लिकेशनद्वारे सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराच्या मोबाईलचा ताबा मिळवला. याचा फायदा घेत त्यांनी बॅंकिंग अ‍ॅपद्वारे तक्रारदाराच्या बॅंक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले. बँकेतून पैसे गायब होताच फसवणूक झालेल्या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली. सायबर क्राईम पोलीस, रायबंदर यांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने तक्रारदाराला त्याच्या मोबाइल फोनवर ‘टीम व्ह्यूअर’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर, आरोपीने तक्रारदाराच्या मोबाईल फोनवर अनधिकृत प्रवेश मिळवला आणि त्याच्या बँकिंग अ‍ॅपमध्ये (App) प्रवेश केला. पुढे त्याने पैसे ट्रान्सफर केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रिमोट ऍक्सेस अ‍ॅपचा वापर डिव्हाइसचा प्रत्यक्ष ताबा न घेता वेगळ्या ठिकाणाहून डिव्हाइस नियंत्रित करण्यासाठी केला जातो. अशा अ‍ॅप्सपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी (Police) केले आहे.

Cyber Crime
रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम गोव्यात खाद्य तेलाच्या किमतींवर

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तुमचे मोबाईल सिमकार्ड अपडेट न केल्यास ब्लॉक होईल, असे फोनद्वारे सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे. लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार एका अ‍ॅपद्वारे तुमच्या फोनचा (Phone) ताबा मिळवतात. लोकांनी सतर्क रहावे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com