Fraud in ponda during Goa Election period Dainik Gomantak
गोवा

फोंड्यातील छुपे रुस्तमांबद्दल ‘खमंग चर्चा’ सुरू

वजन व मापे खात्याच्या फोंडा विभागाने उसगाव येथे भाजीची, किराणा मालाची दुकाने तसेच दारूची दुकाने अशा २९ ठिकाणी छापे टाकले

दैनिक गोमन्तक

शिमगा संपला तरी कवित्व उरते याप्रमाणेच फोंड्यातील निवडणूक (Goa Election) संपली तरी मतदारसंघातील छुपे रुस्तमांबद्दल ‘खमंग चर्चा’ सुरू आहे. निवडणूक काळात अनेक गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यात कोणी कोणाला ‘शेंडी’ लावली यावर बोट ठेवले जात आहे. फोंड्याच्या काही नगरसेवकांनी तर आपल्या उमेदवाराला कसा ‘चुना’ लावला याबाबतीत चविष्ट किस्से ऐकू येत आहेत.

भाजपच्या (BJP) एका नगरसेवकाने म्हणे काँग्रेसच्या उमेदवाराला मते देण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले, तर काँग्रेसचा (Congress) प्रचार करणाऱ्या एका नगरसेवकाने आपल्या कार्यकर्त्यांना कमळाला मत द्या असा फतवा काढल्याची चर्चा आहे. तसेच भाजपचे एक ज्येष्ठ पदाधिकारी फोन करून आपल्या हितचिंतकांना म्हणे मगोपला मते द्या असा सल्ला देत होते. आता खरे काय आणि खोटे काय हे झरेश्‍वरच जाणे, पण आग लागल्‍याशिवाय धूर निघत नसतो हेही तेवढेच खरे नाही का? एकंदरीत निवडणूक काळातील छुप्या रुस्तमांचा फोंडा शहरात ‘बोलबाला’ दिसतो आहे. ∙∙∙

वजन व मापे खात्याचे फोंडा, उसगावात छापे

वजन व मापे खात्याच्या फोंडा विभागाने दोन दिवसांपूर्वी उसगाव येथे भाजीची, किराणा मालाची दुकाने तसेच दारूची दुकाने अशा २९ ठिकाणी छापे टाकून तिथे वापरली जाणारी अनधिकृत वजने व मापे जप्त केली.

या भागात विकल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये वजनात फेरफार आढळून येतो अशा तक्रारी आल्यावर ही कारवाई केल्याची माहिती फोंडा विभागाचे निरीक्षक शुबर्ट डिकॉस्ता यांनी दिली. कित्येक ठिकाणी अनधिकृत वजन व मापे वापरण्यात येत असल्याचे यावेळी आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT