किरण ‘नॉट रिचेबल’, कांदोळकरांवरही ममतादीदी नाराज

पक्षाने पदाचा राजीनामा मागूनही ते देत नसल्याने त्यांची गच्छंती करण्याचा निर्णय तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी घेतल्याची माहिती समोर आली.
Kiran Kandolkar
Kiran KandolkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोठ्या गाजावाजासह विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसला आता उतरती कळा लागली आहे. राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर आता राज्य कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांचा नंबर लागला अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने पदाचा राजीनामा मागूनही ते देत नसल्याने त्यांची गच्छंती करण्याचा निर्णय तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, या सर्व अफवा असल्याचे कांदोळकरांनी माध्यमांना सांगितले आहे. (developments in Goa TMC have sparked political discussions)

Kiran Kandolkar
गोवा गुदमरतोय गलिच्छतेच्या गर्ततेत

विधानसभेत (Goa Assembly Election) अपेक्षप्रमाणे कामगिरी न केल्याने केंद्रीय समिती लुईझिन फालेरो यांच्याबरोबर किरण कांदोळकर यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे या दोघांनाही त्यांच्या पदाचे राजीनामे देण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ते दिले नाहीत म्हणून फालेरो यांच्या बाबत संपूर्ण केंद्रीय समितीच बरखास्त केली आणि नव्या समितीवर त्यांना पदापासून बाजूला ठेवण्यात आले. तर आता कांदोळकर यांच्या बाबतही हाच निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यांना पदावरून पायउतार होण्यास सांगितले आहे. मात्र, ते पद सोडण्यास तयार नसल्याने त्यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी केवळ तीन महिने गोव्यात येऊन तृणमूल कॉँग्रेसने (Goa TMC) मोठा गाजावाजा करीत अनेक नेत्यांना आपल्या पक्षात ओढले होते. मात्र, अनेकांनी पदे व प्रतिष्ठा घेऊनही पक्षाचे काम केले नाही. त्यामुळे केंद्रीय कार्यकारिणी नाराज आहे.

Kiran Kandolkar
संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या डॉ.गावकरांनी केले शेतीत आधुनिक प्रयोग

कांदोळकरांची पुढची चाल कोणती?

२०२२ मध्ये निवडणुकांच्या तोंडावर पत्नी जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांच्यासह किरण यांनी तृणमूलची वाट धरली. हळदोणा आणि थिवी मतदारसंघातून पती-पत्नीने निवडणूक लढवली. निकाल अद्यापही येणे बाकी असतानाच त्यांना राज्य कार्याध्यक्ष पद सोडावे लागत आहे. आता कांदोळकर पुढची चाल काय खेळणार याची उत्सुकता आहे.

‘त्या’ सर्व अफवा

किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांच्याबाबत विविध चर्चांना उधाण आले असताना त्यांनी मात्र याचे खंडन केले आहे. या सर्व अफवा आहेत. मी मंगळवारी एक बैठक घेणार असून त्यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होईल असे कांदोळकर यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, दिवसभर त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.

किरण ‘नॉट रिचेबल’

लुईझिन फालेरो यांच्या खांद्यावरील राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची झुल ममता दीदींनी खाली उतरविल्यानंतर गोव्यात तृणमूलबद्दल अनेक वदंता पसरू लागल्या आहेत. रविवारी कुणीतरी असेच किरण कांदोळकर तृणमूल सोडणार अशा आशयाचे पिल्लू सोडले. सोमवारी आणखी एक बातमी येऊन थडकली, की किरण कांदोळकरांकडचे राज्य अध्यक्षपदही काढून घेण्यात आले आहे. यावर अधिक स्पष्टीकरण मागण्यासाठी गोवा तृणमूलच्या काही पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, छे! ही तर अफवा!! असे म्हणून त्यांनी ही शक्यता नाकारली. ही बातमी कन्फर्म होते का हे पाहण्यासाठी किरण यांनाच फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण दिवसभर त्यांचा फोन बंदच होता. त्यामुळे डाळीत काही काळे तर नाही ना? ही शंका आलीच बुवा!! ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com