Kavale Math Canva
गोवा

Kavale Math: शिवानंद स्वामींविरोधात गुन्हा नोंद झाल्याच्या बातमीमुळे खळबळ! मनमानी कारभारावरून वेगवेगळे मतप्रवाह

Swami Shivanand Saraswati land dispute case: विकलेली जमीन ताबडतोब दिवाणी न्यायालयात जाऊन परत मिळविण्यात आल्याने डॉ. रामाणी यांनी केलेले आरोप आणि तक्रारी कालबाह्य झाल्याचा दावा मठाशी संबंधित व्यक्तींनी केला होता.

Sameer Panditrao

Kavale Math Shivanand Swami Crime News Ponda

पणजी: फोंडा तालुक्यातील वेळप-कवळे येथील कवळे मठाच्या जमीन विक्रीचा सारा व्यवहार दिवाणी न्यायालयातून रद्दबातल ठरविण्यात येऊन पैसे परत देऊन जमीन परत ताब्यात मिळविली असली, तरी शिवानंद सरस्वती स्वामींना मुळात जमीन विकण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्‍न स्वामींच्या विरोधात फोंडा पोलिसांत फौजदारी तक्रार करणारे डॉ. पी. एस. रामाणी यांनी केला आहे.

कवळे येथील एका संस्थेला विकलेली जमीन ताबडतोब दिवाणी न्यायालयात जाऊन परत मिळविण्यात आल्याने डॉ. रामाणी यांनी केलेले आरोप आणि तक्रारी कालबाह्य झाल्याचा दावा मठाशी संबंधित व्यक्तींनी केला होता. त्याला रामाणी यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणतात, ‘तोतयेगिरी व जमीन विक्री व्यवहार बेकायदेशीरच आहे.’

कवळे गौडपादाचार्य मठाच्या नियमावलीत सर्व स्थावर व जंगम मालमत्तेसंदर्भात सर्व अधिकार विश्‍वस्त मंडळाला असून स्वामी केवळ पूजा-अर्चा व आध्यात्मिक बाबतीतच निर्णय घेऊ शकतात. परंतु गेल्या पाच वर्षांपासून शिवानंद सरस्वती स्वामींनी ही नियमावली न स्वीकारता स्वत:चे एक विश्‍वस्त मंडळ स्थापन केले आहे. या विश्‍वस्त मंडळात प्रख्यात खनिज निर्यातदार प्रफुल्ल हेदे आहेत.

सूत्रांच्या मते, असे विश्‍वस्त मंडळ परस्पर स्थापन करणे म्हणजेच नियमांचा भंग आहे; कारण त्यात मंगेशी आणि कवळे देवस्थानचे प्रत्येकी दोन सदस्य कायमस्वरूपी सदस्य म्हणून स्वीकारणे भाग असते. स्वामींनी स्थापन केलेल्या मंडळात त्यांची नियुक्ती केलेली नाही; उलट त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर आपण त्यावर पुढे विचार करू, असे सांगून त्यांनी ही बाब टाळली होती. या दोन देवस्थानांनी मठ स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांच्या सदस्यांची विश्‍वस्त मंडळावर नियुक्ती अनिवार्य बनविण्यात आली होती.

मठाशी संबंधित सूत्रांनी आज ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, फोंडा पोलिसांत शिवानंद सरस्वती स्वामींविरोधात गुन्हा नोंद झाल्याची बातमी प्रसिद्ध होताच तेथे एकच खळबळ उडाली. तसेच पोलिसांच्या कारवाईबाबत आणि सरकारी पवित्र्याबाबत चर्चा सुरू झाली.

स्वामींना निकट असलेला एक गट स्वत:च्याच पद्धतीने या कारवाईचा अर्थ लावू पाहात आहे. स्वामींना मठाशी संबंधित सर्व मालमत्तेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे व उच्च न्यायालयाने निश्‍चित केलेली ‘नियमावली’ तसेच जुने विश्‍वस्त मंडळ याला स्वामी जबाबदार नाहीत, अशी त्यांची भावना आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, धर्मादाय आयुक्तांनी या ‘नियमावली’ला मान्यता दिलेली नाही, त्यामुळे स्वामींनी स्वत:च्या मर्जीनुसार जुने विश्‍वस्त मंडळ बरखास्त केले आणि डॉ. प्रफुल्ल हेदे आदी नवे सदस्य त्यावर नेमले आहेत.

त्याउलट विश्‍वस्त मंडळावरील जुने सदस्य स्वामींच्या दाव्याला आव्हान देत स्वामींना विश्‍वस्त मंडळ व मालमत्ता व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा करतात. मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांसमोर येत्या ३० जानेवारीला काही महत्त्वाची प्रकरणे अंतिम सुनावणीला यायची आहेत.

मंगेशी व कवळे देवस्थान समित्यांमध्येही यापूर्वी त्यांचे घटनादत्त प्रतिनिधी मठाच्या विश्‍वस्त मंडळावर घेण्यात आले नसल्याची चर्चा झालेली आहे. याबाबत विचारता मंगेशीचे अध्यक्ष डॉ. अजित कंटक म्हणाले, ‘आम्हाला जरूर आमच्या देवस्थानचे सदस्य मठाच्या विश्‍वस्त मंडळावर कायमस्वरूपी असावेत, असे प्रकर्षाने वाटते.

लवकरच स्वामीजी ती घटनादत्त तरतूद पूर्ण करतील, अशी मला खात्री आहे. देवस्थान व मठाच्या जमिनी कोणालाही विकता येत नाहीत, अशी नेमकी प्रतिक्रिया डॉ. कंटक यांनी काल ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिस तक्रारी, गुन्ह्याची नोंद आणि याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मठ संप्रदायाची एक विशेष बैठक बोलवावी, अशी विनंती स्वामींना करण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला मठाशी संबंधित देवस्थानातील अनुयायांची एक बैठक लवकरच घेतली जाईल. त्यात स्वामींनी नियमावलीची केलेली पायमल्ली, ठिकठिकाणी जमिनी विकण्याचा चालविलेला प्रयत्न, बेकायदेशीर नेमणुका आदी प्रश्‍न चर्चेला घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT