Noida Crime News Dainik Gomantak
गोवा

Noida: यूट्यूबवर पाहिला गोव्याचा व्हिडिओ, बीचवर जाण्यासाठी चौघांनी थेट सर्व्हिस सेंटरच लुटले

सुविधा केंद्र लुटण्यासोबतच बदलापूर येथील महिला रीना हिच्या दुचाकीवरून चोरट्यांनी चेन लुटण्याचाही प्रयत्न केला.

Pramod Yadav

Noida Crime News: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील चिपियाना बुजुर्ग येथील सार्वजनिक सुविधा केंद्रात घुसून 30,000 लुटणाऱ्या चार चोरट्यांना बिसरख कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. चौघेही एकमेकांचे मित्र आहेत. गोव्याला जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी सार्वजनिक सुविधा केंद्रावर दरोडा टाकत लूट केली.

चोरट्यांच्या ताब्यातून 17 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या दरोड्याच्या नंतर तीन दिवस चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर केले असता चारही जणांना पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

चारही चोरटे उद्यानात बसून चोरी केलेली रक्कम वाटून घेत होते. तेव्हाच या चोरट्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोरट्यांना जेरबंद केले. पप्पू कुमार, रोहित, आशिष उर्फ ​​विकास आणि चांद अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अशी माहिती बिसराख कोतवालीचे प्रभारी अनिल राजपूत यांनी दिली.

चार चोरट्यांचे वय 20 ते 18 दरम्यान आहे. या चौघांनीही आठ दिवसांपूर्वी यूट्यूबवर गोव्याचा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये समुद्राच्या लाटांमध्ये लोक मस्ती करत होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर चौघांनीही आपणही गोव्याच्या सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. चौघांकडे पैसे नसल्याने त्यांनी लुटमारीचा कट रचला.

सार्वजनिक सुविधा केंद्र लुटण्यासोबतच बदलापूर येथील महिला रीना हिच्या दुचाकीवरून चोरट्यांनी चेन लुटण्याचाही प्रयत्न केला. महिला दुचाकीवरून पडली, तिलाही दुखापत झाली. मात्र, चोरट्यांना साखळी लुटता आली नाही.

नोएडा येथील निवृत्त आयएएसच्या घरातून 15 लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना यापूर्वीही समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्या घरात काम करणाऱ्या घरगुती नोकराने 15 लाखांची रोकड आणि लाखोंचे दागिने चोरून पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT