SSC Konkani Paper: दहावीच्या कोंकणी पेपरमध्ये चूक, सर्वांना मिळणार 'एक गुण'
Goa SSC Exam: गोव्यात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. 01 एप्रिलपासून राज्यात दहावीच्या परीक्षेस सुरूवात झालीय. दरम्यान, दहावीच्या कोंकणी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शिक्षण मंडळाच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण मंडळाच्या तपासणी पथकाने कोंकणी पेपरमधील चूक लक्षात घेता प्रश्नपत्रिकेच्या छापाईत अनावधाने चूक झाली आहे. त्यामुळे या चूक प्रकरणी विषयाच्या सर्वांना एक गुण दिला जाणार आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 20,489 विद्यार्थी बसले असून, त्यात 10,411 मुले आणि 10,078 मुली आहेत.
या परीक्षेसाठी 423 रिपीटर विद्यार्थी आणि 72 खाजगी उमेदवारांनीही नोंदणी केली आहे. तेवीस विद्यार्थी आयटीआय नोंदणी म्हणून दहावीच्या परीक्षेला बसलेत. राज्यातील 31 केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ही परीक्षा होत आहे.
गोवा बोर्डाने कोरोना महामारीच्या काळात विशेष काळजी म्हणून दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम दोन सहामाहीमध्ये विभागला होता. पहिली टर्म-एंड परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती. “पहिल्या टर्म आणि सेकंड टर्म परीक्षेच्या कामगिरीवर आधारित निकाल निश्चित केला जाईल. पहिली टर्म आणि सेकंड टर्म परीक्षेसाठी वेगळी मार्कशीट दिली जाणार नाही,” असे बोर्डाने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.