Colvale Theft Dainik Gomantak
गोवा

Colvale Theft: बांधकाम साईटवरुन 400 लोखंडी सळ्यांची चोरी; स्क्रॅपयार्ड मालकासह 4 अटकेत

Iron Rods Theft in Colvale: पोलिसांनी संशयितांकडून चोरीचा माल हस्तगत केला असून, या सर्वांना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Sameer Panditrao

Iron Rods Theft in Colvale

म्हापसा: हाऊसिंग-बोर्ड-कोलवाळ येथील हळर्णकर एज्युकेशन सोसायटीच्या बांधकाम साईटवरुन ४०० लोखंडी सळ्या कापून चोरून नेल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी स्क्रॅपयार्डच्या मालकासह चौघांना अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून चोरीचा माल हस्तगत केला असून, या सर्वांना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर चोरीची घटना सप्टेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालवधीत घडली होती. या चोरीच्या मुद्देमालाची किंमत १.८० लाख रुपये इतकी आहे. अटक केलेल्यांमध्ये स्क्रॅपयार्ड मालक खतालसाब बेपारी (५४), कामगार मंजा लमाणी (३०, म्हापसा, मूळ कर्नाटक), सुरेंद्र जैसवाल (३२, म्हापसा, मूळ उत्तर प्रदेश), शरुन कुमार (२३, कोलवाळ, मूळ उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून या चोरीत एक स्क्रॅपयार्ड डिलर सहभागी असल्याचे समजले. त्यानुसार करासवाडा-म्हापसा येथे स्क्रॅपयार्डमध्ये पोलिसांनी झडती घेतली असता, तिथे चोरीचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी नारायण डिचोलकर हे तक्रारदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT