
Goa Crime Cases In 2024
मडगाव: नुकत्याच सरलेल्या २०२४ सालात दक्षिण गोव्यात गुन्ह्यांचे प्रमाण जरी वाढले असले तरी त्यातील बऱ्याच प्रकरणांचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले आहे. दक्षिण गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षभरात, सुमारे ८५० गंभीर स्वरूपांतील गुन्हे घडले. मात्र, त्यातील ७५१ गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, दक्षिण गोव्यात १ जानेवारी ते २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत १३ खून, १० खुनांचे प्रयत्न, ३९ बलात्कार आणि ३ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अन्य गंभीर गुन्ह्यांची संख्या ६५ झाली असून पोलिसांनी सर्व गुन्ह्यांची उकल केली आहे. तीन बलात्कार प्रकरणांचा अपवाद वगळता अन्य प्रकरणांचा पोलिसांनी तपास लावला आहे.
याच कालावधीत पोलिसांनी ५ दरोडे, ५० घरफोड्या, ४३ दुचाकींची चोरी, ८ चेन स्नॅचिंग, ३६ मोबाईल व अन्य गॅझेटच्या चोरीचे अशा एकूण १७० चोरीसंदर्भातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी १०७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. या यशाची टक्केवारी ६२.९४ टक्के एवढी आहे.
याशिवाय फसवणुकीच्या ६० गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यातील ५३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच प्राणघातक हल्ल्याच्या १०७ पैकी १०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. पोलिसांनी अपहरणाच्या ३५ प्रकरणांचाही सामना केला त्यातील २९ घटनांमध्ये संशयितांना यशस्वीरित्या अटक केली.
हिंसक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना लक्षणीय यश मिळाले असले तरी मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांचा शोध घेणे हे एक आव्हान राहिले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीवर जनतेचा विश्वास सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी आता चोरी आणि घरफोड्यांबद्दल त्यांचे प्रतिसाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.