Joildo Aguiar Dainik Gomantak
गोवा

Ponda : फोंड्याचे माजी मंत्री आगियार यांचे निधन

वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यातील एक ज्येष्ठ नागरिक तथा फोंडा मतदारसंघाचे आमदार व गोवा राज्याचे माजी कृषीमंत्री ज्योईल्द सौझा आगियार (84) यांचे आज (बुधवारी) सकाळी निधन झाले.

अंत्यसंस्कार गुरुवार, 16 रोजी सायंकाळी 4.30 वाजता करण्यात येतील. त्यासाठी फोंड्यातील माऊंट कार्मेल चर्चमध्ये धार्मिक विधी होणार आहेत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असेच आहे.

30 ऑक्टोबर 1938 मध्ये त्यांचा जन्म पोर्ताईस-पणजी येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर मोरजी येथील विद्यालयात शिक्षक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर पोस्ट खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.

पण सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी फोंडा पालिकेच्या निवडणुकीत 1970 मध्ये उमेदवारी दाखल केली आणि पहिल्यांदाच त्यांची नगरसेवक म्हणून निवड झाली.

फोंडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी १९८० मध्ये निवडणूक लढवली व ते जिंकून आले. गोवा सरकारात प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात कृषीमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली, कृषी खात्याबरोबरच त्यांच्याकडे पर्यटन, पशुसंवर्धन तसेच समाजकल्याण अशी महत्त्वाची खाती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT