Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: नरेश सावळ लोकसभा रिंगणात शक्य

Lok Sabha Election: कोणत्या शक्तीचा पाठिंबा?: सणांच्या निमित्ताने शुभेच्छांचे फलक

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election: डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ आता लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करू लागले आहेत. सावळ हे सत्ताधारी मगो पक्षात असल्याने आणि मगो हा भाजप सरकारमधील घटक पक्ष असल्याने त्यांना मगोची उमेदवारी मिळणे शक्य नाही. त्याचमुळे सावळ यांच्या या राजकीय डावपेचामागे सत्ताधारी वर्तुळातील कोणाचा पाठिंबा असावा, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांचे कडवे समर्थक मानले जाणारे नीलेश काब्राल यांना राजीनामा द्यावा लागला. यामागेही या सावळ यांना पाठिंबा देणाऱ्या शक्तीचा हात असावा, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. सावळ यांचे तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक उत्तर गोवाभर उभे राहिले होते.

त्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छांचे तुलनेने मोठे फलक लावण्यात आले आहे. त्या फलकांखाली सावळ यांचे मित्रमंडळ आणि मतदारसंघाचे नाव असे लिहिण्यात आले आहे, असे उत्तर गोवा जिल्हाभर सावळ याचे मित्रमंडळ असल्याचे प्रथमच उघडकीस आले आहे. हे काम ज्या शिस्तीत आणि पद्धतशीरपणे झाले त्यामागे शक्ती उभी असल्याचे दडून राहिलेले नाही.

सावळ यांनी राजकीय कारकिर्दीची सुरवातच बंडखोरीने केली होती. त्यांना उमेदवारी नाकारल्यावर ते डिचोली मतदारसंघातून अपक्ष लढले. त्यावेळी राजकारणातील एका मित्राने त्यांच्यामागे पहाडासारखे उभे राहणे पसंत केले होते. आपल्या समर्थनार्थ जास्तीत जास्त आमदार असावे, असा त्या मित्राचा प्रयत्न होता. त्यातून राज्यातील सर्वोच्च राजकीय पद म्हणजेच मुख्यमंत्रिपद आपल्याकडे यावे, असेही नियोजन सावळ यांच्या त्या मित्राचे होते. पुढे राजकारण आपल्या गतीने सरकत राहिले. सावळ मगोत गेले आणि आमदारही झाले.

दिवाळीनिमित्त फलक लावणे

आता पुन्हा सावळ यांच्या मैत्रीची म्हणे, त्या मित्राला आठवण झाली आहे. सावळ यांनीही ती संधी घेण्याचे ठरवले आहे. यातून कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतील, हे आताच सांगणे कठीण आहे. दरम्यान, याबाबत सावळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोकसभेसाठी भाजप किंवा कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळाली, तर ती मी स्वीकारेन. सध्या मी मगोत आहे. सत्ताधारी अनेक आमदार माझे मित्र आहेत. ते मला पाठिंबा देतील. मला जनतेचे मोठे समर्थन आहे. चतुर्थाच्या वेळी माझ्या नावे शुभेच्छा देणारे फलक कोणी लावले होते, हे मला ठाऊक नाही. दिवाळीच्या शुभेच्छांचे फलक आमच्याकडूनच लावले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT