Goa Crime: डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हे वाढत असून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, असा दावा गट काँग्रेसने केला आहे. गुन्हे नियंत्रणात आणून कायदा, सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदनही पोलिसांना दिले आहे. प्रदेश काँग्रेस समितीचे महेश म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज (सोमवारी) डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली. गट युवा काँग्रेसचे मनोज नाईक यांच्यासह फिरोज बेग आदी कार्यकर्त्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. पोलिस स्थानकातील वरिष्ठ अधिकारी ''इफ्फी''च्या बंदोबस्तासाठी गेल्याने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ड्युटी ऑफिसरची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
अलीकडच्या काळात डिचोली तालुक्यात विनयभंग, मारहाण आदी गैरकृत्ये वाढत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. वाहतुकीतही बेशिस्तपणा वाढला असून, अपघातांचे प्रमाण वाढत आहे, असा दावा निवेदनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, गुन्हे नियंत्रणात आणून कायदा, सुव्यवस्था जाग्यावर घालावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. या पोलिस स्थानकात पोलिस बळाची नियुक्ती करून गुन्हे नियंत्रणात आणि कायदा, सुव्यवस्था जाग्यावर घालावी, अशी मागणी महेश म्हांबरे यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.