Goa Traffic
Goa Traffic Dainik Gomantak
गोवा

Panji Traffic Jam: सलग तिसऱ्या दिवशी ‘कोंडी’; पणजी खोळंबली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panji Traffic Jam : राजधानी पणजीत ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत तसेच जी-20 परिषद बैठकांच्‍या पूर्वतयारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे डांबरीकरण आणि इतर कामे सुरू आहेत.

परंतु सरकार आता सर्वसामान्य जनतेच्या संयमाचा अंत पाहत असून विकास आणि स्मार्ट सिटीच्‍या नावाखाली जनतेस वेठीस धरत आहे. त्‍यामुळे केव्हाही जनतेच्‍या संतापाचा उद्रेक होऊ शकतो.

गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पणजी व पर्वरी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे लोक भर उन्‍हात अडकून पडले. त्‍यामुळे त्‍यांनी आजही सरकारला शिव्‍याशाप दिले.

‘एक ना धड, भारा भर चिंध्या’ अशी अवस्था पणजीची झाली आहे. राजधानीचा विकास होणे गरजेचा आहे, परंतु त्यासाठी नियोजनाची गरज आहे. सुट्टीच्या दिवशी तसेच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात काम होणे अपेक्षित आहे. पण सध्‍या हजारो वाहनांच्या कोंडीमुळे पणजीचा श्‍‍वास गुदमरत आहे.

स्मार्ट सिटीच्या या अनागोंदी कारभाराकडे स्थानिक राजकीय नेत्यांनी तर डोळझाक केलीच आहे, परंतु स्मार्ट सिटी प्रकल्प ज्यांच्या अखत्यारित येतात, ते जिल्हाधिकारीही कोणतीच पावले उचलताना दिसत नाहीत. मुख्यमंत्रीही या सर्व स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना जनमानसात आहे.

दरम्‍यान, वाहनचालकांना येजा करण्यासाठी अटल सेतू हा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. परंतु या पुलावर दोन्ही बाजूंनी डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

वाहनचालकांचा जाणीवपूर्वक छळ!

बुधवारी गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने तसेच वर्दळ कमी असल्याने रस्‍ता डांबरीकरण काम उरकून घ्‍यायला हवे होते. परंतु तसे काही झाले नाही. त्‍यामुळे जनतेच्या पिळवणुकीसाठी ही कामे जाणीवपूर्वक वर्दळीच्या दिवशी करण्यात येतात का, असा संशय निर्माण झाला आहे.

नव्या पाटो पुलावर डांबरीकरण सुरू आहे. तसेच अटल सेतूवरही दोन्ही बाजूला रस्‍ता डांबरीकरण करण्‍यात येत असल्‍याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अटल सेतू, दिवजा सर्कल, मांडवी पूल, पर्वरी सिग्नल आदी सर्वच ढिकाणी भर दुपारी उन्हाच्या झळा सहन करत तासन्‌तास वाहतूक कोंडीत लोक अडकून पडत आहेत.

रुग्णवाहिकाही पडल्‍या अडकून

प्रचंड वाहतुकीच्‍या कोंडीत सर्वसामान्य वाहनचालक अडकलेच, परंतु संध्याकाळी झालेल्या वाहतूक कोंडीत चार-पाच रुग्णवाहिका देखील अडकून पडल्‍या. सर्वसामान्यांसह रुग्णांचा जीवही त्‍यामुळे टांगणीला लागला.

गोमेकॉत जाण्यासाठीही तिष्‍ठत पडावे लागले. तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडलेल्या नागरिकांना कधी एकदा या कोंडीतून सुटका होते असे झाले होते. मात्र रात्री 10 नंतरही पणजी व पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. त्यामुळे पणजीत येण्याऱ्या लोकांना आता दहावेळा विचार करूनच यावे लागेल असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT