Mormugao Crime: अनैतिक कामाचा जाब विचारल्यावरून मुरगावात सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

4 युवकांविरोधात गुन्हा दाखल
Mormugao Crime
Mormugao CrimeDainik Gomantak

Mormugao Crime: मुरगाव सडा येथील एफसीआय गोदामाच्या मागील बाजूस काही युवकांनी बोगदा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भगत यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

Mormugao Crime
CM Pramod Sawant: बजेटपुर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; जाणून घेतली विविध घटकांची मते...

भगत यांना सडा परिसरातील पवन कोळमकर याच्यासह याच भागातील सुरज चोडणकर, ओमकार दुर्भाटकर आणि वास्को वाडे येथील ब्रिटो राज यांच्याविरोधात भगत यांनी मुरगाव पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे.

मुरगाव पोलिसांच्या माहितीनुसार मुरगाव सडा येथील एफसीआय गोदामामागे काही अनैतिक व्यवसाय होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सचिन भगत व त्यांचा मित्र शेखर दाभोलकर यांनी तेथे जाऊन संबंधितांना जाब विचारला.

येथे रिक्षामध्ये बॅरल होते. याविषयी भगत यांनी रिक्षाचालकास विचारले असता, त्याने मोबाईलवरून मालकाला संपर्क साधला.

Mormugao Crime
MLA Delilah Lobo: पर्यटकांना मारहाण ही अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन; कर्मचाऱ्यांची चूक नाही, पर्यटकांवरच गुन्हा नोंदवा!

नंतर तेथे सडा परिसरातील पवन कोळमकर, ओमकार दुर्भाटकर, ब्रिटो राज, सुरज चोडणकर आले. यावेळी भगत व त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी कोळमकर याने सचिन भगत याला मारहाण केली. यात भगत यांचा डावा डोळा दुखावला आहे.

भगत यांनी कोळमकर व इतरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भगत याला आरोग्य तपासणीसाठी दाबोळी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. भगत यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना गोमॅकोमध्ये दाखल केले गेले.

पोलिसांनी संशयित आरोपी पवन कोळमकर, ओमकार दुर्भाटकर, सुरज चोडणकर, ब्रिटो राज विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक यशवंत रायकर पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com