cheap flights to Goa Dainik Gomantak
गोवा

Fly91 Monsoon Offer: जूनमध्ये तिकीट खरेदी करा, ऑगस्टपर्यंत प्रवास करा; फ्लाय91ची पावसाळी भेट, गोवा पर्यटनासाठी खास 'मॉनसून ऑफर'

Fly91 ticket offer June: गोव्याला जोडणाऱ्या पाच महत्त्वाच्या मार्गांचाही समावेश आहे, ज्यामुळे पावसाळ्यात गोव्याला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना मोठा फायदा होईल

Akshata Chhatre

पणजी: गोव्याची प्रादेशिक विमान कंपनी 'फ्लाय९१'ने पावसाळ्यानिमित्त प्रवाशांसाठी एक खास सवलत योजना जाहीर केली आहे. या 'मॉनसून ऑफर' अंतर्गत, कंपनीच्या २० मार्गांवर तिकिटांवर ३०० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. यात गोव्याला जोडणाऱ्या पाच महत्त्वाच्या मार्गांचाही समावेश आहे, ज्यामुळे पावसाळ्यात गोव्याला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना मोठा फायदा होईल.

कधी मिळेल सवलत?

ही विशेष ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असेल. महत्त्वाचे म्हणजे, या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे, पावसाळ्यात गोव्याच्या हिरव्यागार सौंदर्याचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी ठरणार आहे.

पर्यटनमंत्र्यांच्या आवाहनाला 'फ्लाय९१'चा प्रतिसाद

गोवा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच पर्यटन आणि प्रवासी व्यवसायाशी संबंधित घटकांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 'फ्लाय९१'ने ही खास सवलत योजना जाहीर केली आहे.

या मार्गांवर मिळणार 'सवलत'

या सवलतीचा लाभ गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगाव (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांवर मिळणार आहे. या व्यतिरिक्त, पुणे-सिंधुदुर्ग, बेंगळूरु-सिंधुदुर्ग, हैदराबाद-सिंधुदुर्ग, जळगाव-हैदराबाद, जळगाव-पुणे आणि गोवा-सोलापूर या मार्गांवरही ही ऑफर लागू असेल.

'फ्लाय९१'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी या योजनेबद्दल बोलताना सांगितले की, "पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे.

गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे."

सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपातील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर 'फ्लाय९१'ची नियमित उड्डाणे सुरू आहेत. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, अत्याधुनिक एटीआर ७२-६०० प्रकारच्या विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. 'फ्लाय९१'ने पुढील पाच वर्षांत देशभरातील ५० हून अधिक शहरांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे महत्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे, ज्यामुळे प्रादेशिक पर्यटनाला आणखी चालना मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

Viral Video: आधी ट्रेनची काच लखलखीत, मग रुळावर 'ती' कृती... तरूणीचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात

SCROLL FOR NEXT