Goa Flights: फक्त 1991 रुपयांत करा गोवा ते जळगाव विमान प्रवास ; Fly91 च्या नवीन उड्डाणांची घोषणा

Goa Flights: Fly91 कंपनीने दोन ठिकाणांवरुन जळगावसाठी विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे.
FLy91
FLy91Dainik Gomantak

Goa Flights

मूळ गोव्याच्या असणाऱ्या Fly91 या विमान कंपनीने मार्चमध्ये चार शहरांतून व्यावसायिक ऑपरेशन्सला सुरूवात केली. कंपनीने गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू केली. एप्रिलमध्ये आगती, जळगावसाठी थेट उड्डाण सुरु करणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती.

त्यानुसार Fly91 कंपनीने दोन ठिकाणांवरुन जळगावसाठी विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे.

कंपनीने याबाबत माहिती दिली असून, येत्या 18 एप्रिलपासून गोवा आणि हैद्राबाद येथून थेट जळगावसाठी विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रवास केवळ 1991 रुपयांत करता येणार आहे. यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन अथवा नजीकच्या तिकीट विक्री केंद्रावरुन फ्लाईट बुक करता येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

गोवा-जळगाव-गोवा आणि हैदराबाद-जळगाव-हैदराबाद या मार्गावरील उड्डाणे सोमवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध असतील.

FLy91
Goa Loksabha: गोव्यात 70 टक्के लोक भाजप विरोधात; आप आमदार वेंझी व्हिएगस यांचा दावा

याशिवाय आगामी काळात गोवा ते आगती मार्गावर देखील विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी 4391 रुपयांपासून प्रवासभाडे सुरु होईल, असे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय पुण्यासाठी देखील विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

गेल्या महिन्यात कंपनीने बेंगळुरू ते सिंधुदुर्ग हे पहिले उड्डाणही चालवले. गोवा आणि बेंगळुरू दरम्यान सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाणे कार्यरत करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com