Goa Floods
Goa Floods Dainik Gomantak
गोवा

Goa Floods: पूरग्रस्तांना आता रोगराईची भिती...

दैनिक गोमन्तक

डिचोली: वरुणराजाची कृपा झाल्याने पूर ओसरला खरा, मात्र आता पूरग्रस्तांसमोर नानाविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. घरादारांतील चिखल साफ करता, करता पूरग्रस्तांसमोर आता सापांचेही संकट निर्माण झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या साप-जिवाणूनी काही घरांचा आसरा घेतला आहे. चिखल आणि घाणीमुळे रोगराई फैलावण्याची भिती वाढली आहे. दरम्यान, पूर (Goa Floods) ओसरला असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

आमच्या डिचोली प्रतिनिधीने रविवारी सकाळी पुराचा तडाखा बसलेल्या पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस भागात फेरफटका मारला असता, पुरावेळी पाण्याखाली आलेल्या घरांनी साप घुसल्याचे सत्य समोर आले आहे. मांडवी नदीकाठी वसलेल्या सारमानस भागातही पुराचा तडाखा बसला आहे. मांडवी फुटून पाणी गावात घुसले. बंदावस्थेत असलेल्या प्राथमिक शाळा इमारतीसह वाड्यावरील काही घरांनी पाणी घुसले. मंगला उसपकर आणि नलिता कवळेकर या दोन महिलांची घरे तर अर्धीअधिक पाण्याखाली आली होती. या दोन्ही घरांनी चिखल साचला. सामानाची नासधूस झाली. तांदूळ आदी कडधान्यही वाहून गेले. उरलेसुरलेले कडधान्य खराब झाले. अशी कैफियत मंगला उसपकर आणि नलिता कवळेकर यांनी मांडली. आता साप आढळून येत असल्याने घरात भिती वाटते. असेही या महिलांनी सांगितले.

दरम्यान, पुराचा तडाखा बसलेल्या कुटुंबांना लवकर आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी सारमानस भागातील पंच अनिल नाईक यांनी केली आहे. पूर ओसरेपर्यंत अनिल नाईक यांनी पूरग्रस्तांना शक्य ते सहकार्य केले. घरे पाण्याखाली आल्यानंतर दोन्ही कुटुंबांना घराबाहेर रहावे लागले. त्या रात्री नलिता हिने माहेरी, तर मंगला हिच्या कुटुंबाचे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने पिळगावात स्थलांतर केले.

अन्य भागातही समस्या

सारमानस प्रमाणेच पुराचा तडाखा बसलेल्या हरवळे, साळ आदी भागातही नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. हरवळेसह काही घरांची पडझड झाली आहे. घरादारांनी चिखल घाण साचून अस्वच्छता पसरली आहे. पूरग्रस्त भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रोगराईचीही भिती आहे.

सामानाची नासधूस

घरात पावसाचा 'पुरुमेंत' केला होता. पुराचे पाणी घरात शिरल्याने घरातील कडधान्य आणि इतर सामनाची वाताहात लागली. आपले 50 हजाराहून अधिक नुकसान झाले आहे. कालपासून घरातून तीन लहान साप बाहेर आलेत. त्यामुळे भीती वाटतं आहे. पूर आल्यानंतर शुक्रवारी रात्री आपण मुलांसह जवळच माठवाडा येथे माहेरी आसरा घेतला.

-नलिता कवळेकर, गृहिणी, सारमानस.

सामान मातीमोल

जीएमसींत डॉक्टरकडे जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी आपण घराबाहेर पडले. सारमानस गावाबाहेर पडण्याआधीच घरात पाणी भरल्याची खबर मिळाली. घराकडे धाव घेतली. तोपर्यंत पाणी घरात खेळत होते. सामान बाहेर काढण्याचीही फुरसत नव्हती. पाण्यात घरातील कडधान्य आदी सामान मातीमोल झालेय. आता कपाळावर हात मारून घरातील चिखल साफ करावा लागत आहे. साफसफाई करताना घरात मोठा सापही आढळून आला. पुरानंतर डिचोलीच्या मामलेदारांनी आमचे पिळगावच्या सहकारी सोसायटी सभागृहात स्थलांतर केले. पोटापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

-मंगला उसपकर, गृहिणी, सारमानस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT