Goa: तूर्तास शेजाऱ्यांनी दिला आसरा, पुढे काय?

पुराने घर कोसळल्याने सध्‍या शेजाऱ्यांनी आसरा दिला, आता पुढे कसे, अशी व्यथा कुडसे-सत्तरीतील (Kudase, Sattari- Goa) दीपिका दीपक गावकर या महिलेने मांडली.
Goa: Deepika Gaokar.
Goa: Deepika Gaokar.Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये : सहा वर्षांपूर्वी नवरा वारला त्यामुळे आपला अर्धा संसार गेला होता, आता या पुराने माथ्यावर छप्पर होते तेही गेले. आता काय करावे? पुराने घर कोसळल्याने सध्‍या शेजाऱ्यांनी आसरा दिला, आता पुढे कसे, अशी व्यथा मांडत कुडसे-सत्तरीतील (Kudase, Sattari-Goa) दीपिका दीपक गावकर या महिलेने मांडली. कुडशे-सत्तरी हा म्हादईच्या तीरावर वसलेला गाव. म्हादईचा पूर त्‍यांच्यासाठी नवीन नाही. पण यंदा हा आलेला प्रलय त्‍यांना आर्थिक संकटात ढकलून गेला. त्यात दीपिका गावकर ही विधवा महिलाही सापडली. दीपिका गावकर यांचे एक छोटेसे मातीचे घर या गावात होते. नवरा वारला आणि मूलबाळ नाही, अशाने त्‍या एकट्याच जीवनाचा गाडा हाकायच्‍या. परिसरातील गावात कुणाच्या तरी शेती-बागायतीत कामधंदा करून कसेबसे जीवन जगायच्‍या. इतके दिवस किमान छत तरी होते, पण पुरात तेही गेले. आता करायचे काय, असा प्रश्न त्‍यांच्यासमोर उभा आहे. सरकारी यंत्रणेने येथे येऊन मदतीचे आश्वासन दिले खरे, पण ते कधी साकार होणार हा प्रश्‍‍नच आहे.

Goa: Deepika Gaokar.
Goa Flood: 'का ग आम्हावर कोपली...' पुराच्या पाण्यात गेला संसार वाहून

घर कोसळल्याने तिला शेजाऱ्यांनी आसरा दिला आहे. तिथेच जेवणेखाणे होते. सरकारी यंत्रणेने तांदूळ व भाजीपाला आणून पोचवल्याचे तिने सांगितले, पण असे किती दिवस चालणार, असा तिच्या समोर प्रश्न आहे.

कागदपत्रे गाडली गेली मातीत

येथे तिचे घर कोसळले तेव्हा दीपिका गावकर यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड व इतर कागदपत्रे घरात होती. पुराचे पाणी रात्रीच्या वेळी आल्याने गडबडीत जीव वाचण्यासाठी घरातून त्‍या बाहेर पडल्‍या आणि कागदपत्रे घरातच राहिली आहे. घर पूर्ण कोसळल्याने ती सर्व मातीत गाडली गेली आहेत. घराची अजूनही साफसफाई न केल्याने ती पूर्ण खराब होणार आहेत.

ना गृह आधार, ना दयानंद सामाजिक योजना

दीपिका गावकर यांचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले होते. गरीब महिलांसाठी असलेल्या गृह आधार योजनेचा लाभ त्‍यांना मिळाला नाही. त्यानंतर ६ वर्षांपूर्वी त्‍यांचे पती वारले. विधवा महिलेला दयानंद सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत दरमहिना मदत मिळते, पण या योजनेचा तिला लाभ होत नाही. त्‍यामुळे त्‍यांचे जीवन अधिक खडतर बनले आहे.

Goa: Deepika Gaokar.
Goa flood: गिरीश चाेडणकर यांची वाळपईत पुरग्रस्त भागाची पाहणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com