Goa : ‘ओपा’तून आज पाणीपुरवठा

अर्धेअधिक पाणी सोडले : मंत्री पाऊसकर यांच्याकडून दुरुस्तीकामाचा आढावा
Dharbandora : Repair work on Opa water treatment plant in Goa.
Dharbandora : Repair work on Opa water treatment plant in Goa.Dainik Gomantak

फोंडा : महापुरामुळे (Flood) ओपा जल प्रकल्पालाही (Opa water treatment Plant) मोठा फटका बसला असून कालपासून बंद असलेला पाणीपुरवठा (water supply) आता हळूहळू सुरळीत होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत सर्वांना पाणी उपलब्ध होईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी ओपा प्रकल्पातील दुरुस्तीकामाची पाहणी केल्यानंतर सांगितले. दोन दिवसांपासून ओपा जल प्रकल्पातील पाणीपुरवठा ठप्प (stop) झाल्यामुळे आज (रविवारी) मंत्री दीपक पाऊसकर यांनी या खात्याच्या अधिकाऱ्यांसह तसेच नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, कुळेचे सरपंच मनिष लांबोर व इतरांसमवेत भेट देऊन पाहणी केली.

Dharbandora : Repair work on Opa water treatment plant in Goa.
Goa flood: गिरीश चाेडणकर यांची वाळपईत पुरग्रस्त भागाची पाहणी

गेल्या शुक्रवारी आलेल्या महापुराचा फटका ओपा जल प्रकल्पाला बसला आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने जल प्रकल्पातील पंप निकामी झाल्याने ते दुरुस्तीसाठी काढावे लागले. हे दुरुस्तीकाम मुरगाव येथे करण्यात येत असून दुरुस्ती झालेले काही पंप बसवण्यात आले असून त्यातून अर्धेअधिक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तिसवाडी तालुक्यासह फोंड्यातील काही भागांना पाणीपुरवठा झाला आहे. उर्वरित दुरुस्तीकाम मध्यरात्रीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून सकाळी सर्वांना पाणी उपलब्ध होईल, असे दीपक पाऊसकर म्हणाले.

७० लाख रुपयांचे नुकसान

दरम्यान, या महापुरामुळे ओपा जल प्रकल्पाला सुमारे ७० लाख रुपयांची नुकसानी झाल्याची माहितीही मंत्री पाऊसकर यांनी दिली. अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या पातळीची चौकशी करण्यात येत असून कर्नाटकतील सुपा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने त्याचा फटका बसला आहे काय, याची चौकशी करण्यात येत असल्याचेही पाऊसकर यांनी सांगितले. सुपा धरणाचे पाणी सोडल्यानंतर ते कारवारमधील काळी नदीला जाऊन मिळते, पण, त्याचा परिणाम गोव्यातील म्‍हादई नदीवर झाला आहे काय, याची चौकशी करण्यात येत असल्याचे दीपक पाऊसकर यांनी स्पष्ट केले.

Dharbandora : Repair work on Opa water treatment plant in Goa.
Goa Flood: 'का ग आम्हावर कोपली...' पुराच्या पाण्यात गेला संसार वाहून

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com