Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्कोत भरधाव ट्रकचा थरार! दोन कार नेल्या फरफटत

अपघाताने वास्कोतील नागरीक धास्तावले

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : वाडे, वास्को येथे एका भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या दोन कारला फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धडकेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र या अपघाताने वास्कोतील नागरीक धास्तावले आहेत.

(Five vehicles have been hit by a speeding truck in vasco)

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री (दि. 20 ) रोजी चिखली उतरणीवरून वास्कोला जात असताना एका ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने त्याने वाडे येथे दी फ्लोरा ग्रॅंण्ड हॉटेल जवळ रस्त्यावर पार्क केलेल्या एका कारला धडक दिली व ती कार फरफटत पुढे नेली व नंतर समोरून येणा-या एका कारला धडक दिली. या कारमध्ये जोडपे होते. या अपघातात कारचे नुकसान झाले मात्र दोघेही सुखरूप बचावले.

अपघातग्रस्त ट्रक मुरगाव बंदरात जात असताना हा अपघात घडला आहे. घटना घडल्यानंतर वास्को पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व ट्रक चालकाला ताब्यात घेतले नंतर त्याची सुटका करण्यात आली. बंदरात जाणाऱ्या ट्रकांना वास्को शहरातून जाण्यास मज्जाव असताना देखील ट्रक चालक रात्रीचे भरधाव वेगाने शहरातून बंदराकडे जात असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अवजड ट्रक वाहरांची शहरातून वाहारक कायमची बंद करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे. तसेच वाडे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार चाकी वाहने पार्क करून ठेवत असल्याने वाहतूक रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचण येत असल्याचे वाहन चालकाकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT