LED Fishing Dainik Gomantak
गोवा

Hollant LED Fishing: स्थानिकांच्या सतर्कतेने एलईडी मासेमारी करणाऱ्या पाच जणांना अटक; हॉलांत किनाऱ्यावर केली कारवाई

त्या बोटच्या मालकावर कडक कारवाई करा

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: स्थानिक मच्छिमारांनी काल रात्री हॉलांत समुद्रकिनाऱ्यावर एलईडी दिवे आणि जनरेटर असलेली मच्छिमारी बोट पकडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही बोट महाराष्ट्रातील आकिब मुजावर याच्या मालकीची आहे.

(Five arrested for fishing with LED on Hollant sea )

मिळालेल्या माहितीनुसार हॉलांत येथील स्थानिक मच्छिमारांना काल रात्री 11.30 वाजता एक बोट एलईडी लाईटसह खोल समुद्रात दिसली. त्यांनी लगेच आपली बोट घेऊन तेथे धाव घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता या बोटीवरील कर्मचारी निरूत्तर झाले.

यावेळी स्थानिक मच्छिमारांनी मच्छिमारी विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान आज सकाळी पुन्हा विभागाशी संपर्क साधत मच्छिमारी विभागाचे अधिकारी हॉलांत येथे येत घटनेचा पंचनामा केला. यावेळी तटरक्षक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान या बोटीची झडती घेतली असता बोटीत एलईडी लाईटस् मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत.

जप्त केलेल्या साहित्यामध्ये एक जनरेटर. तसेच पाण्यात याबोटीला एलईडी लाईटस लावलेल्या आढळल्या. अधिक मिळालेल्या माहितीनुसार हा बोट फक्त एलईडी लाईटस् मारण्यासाठी उपयोगात आणली जात होती व मच्छिमारीसाठी दुसरी बोट येते अशी माहिती प्राप्त झाली आहे. या बोटवरील पाच कर्मचाऱ्यांना तररक्षक पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यन्त चौकशी सुरु होती.

त्या बोटच्या मालकावर कडक कारवाई करा

गोयचो रापोणकारांचो एकवोटचे सरचिटणीस ओलन्सियो सिमॉईश यांनी याविषयी नाराजी व्यक्त करताना एलईडी लाईटवर घालण्यात आलेला बंदी नावापुरती असून उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. याची अंमलबजावणी होत नाही. सरकारने तसेच मच्छीमारी विभागांने याच्यावर तातडीने उपाययोजना करावी तसेच पकडण्यात आलेल्या बोटवर व त्या बोटच्या मालकावर कडक कारवाई अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT