Mopa International Airport |Goa News
Mopa International Airport |Goa NewsDainik Gomantak

Mopa Airport: कधी होणार 'मोपा'वरुन विमान उड्डाण? नवी अपडेट आली समोर

उड्डानासाठी प्रवाशांची प्रतिक्षा मात्र कायम ?
Published on

मोपा विमानतळाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे 11 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मात्र विमानतळ प्रत्यक्ष उड्डाणासाठी पूर्णक्षमतेने कार्यान्वित झाले नसल्याने प्रवाशांना 5 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार असल्याची चर्चा आहे.

(Mopa airport likely to start operations from January 5)

मिळालेल्या माहितीनुसार विमानतळाचे काम अंतिम टप्यात असले तरी ते पुर्ण झालेले नाही. ते पुर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना विमान सेवेचा लाभ घेता येणार आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक आणि वायू वाहतूक संबधिक काम अद्याप अपूर्ण आहे.

Mopa International Airport |Goa News
Mopa Airport: काम अपूर्ण उद्धाटनाची घाई, मोपावरील उड्डाणसाठी करावी लागणार प्रतिक्षा

मोपाचे उद्घाटन झाले तरी प्रवाशांची प्रतिक्षा मात्र कायम

मोपा विमानतळासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग अद्याप तयार नाही. विमानतळावरील माहिती फलक, अग्निशमन सुविधा, दरवाजे आणि इतर सुरक्षा साधने यांची देखील तयारी अपूर्ण आहे. याला वेळ लागत असल्याने परिणाम म्हणून उड्डाणासाठी 5 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोपाचे उद्घाटन झाले तरी प्रवाशांची प्रतिक्षा मात्र कायम असणार आहे.

Mopa International Airport |Goa News
Climate Change: वातावरण बदलामुळे गोवेकर हैराण, 'असे' आहे गोव्याचे हवामान

एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, ज्या लोकांनी गोव्यात जाण्यासाठी तिकीट खरेदी केले आहेत, त्यांची विमान उड्डाणे आता मोपा येथून उतरतील किंवा निघतील याबाबत सविस्तर माहिती त्यांना एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. त्यामुळे नागरीकांना विमान सेवेसाठी 5 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com