Climate Change
Climate ChangeDainik Gomantak

Climate Change: वातावरण बदलामुळे गोवेकर हैराण, 'असे' आहे गोव्याचे हवामान

सकाळी धुके, दिवसभर दमट हवामान तर रात्री पाऊस असे वातावरणात बदल होत असून याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.
Published on

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे थंडी कमी झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये अचानक गारवा कमी झाल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढला आहे. सकाळी धुके, दिवसभर दमट हवामान तर रात्री पाऊस असे वातावरणात बदल होताहेत आणि याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) ने जारी केलेल्या नवीन अहवालानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) अनेक भागात घसरला आहे. मुंबईच्या बहुतांश भागात २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी धुक्याची चादर पाहायला मिळाली.

गोव्यात सध्या 29° तापमानाची नोंद झाली आहे. गोव्या रात्रीच्या वेळी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने खराब हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. प्रदूषित झालेल्या हवेचा परिणाम लहान मुलांच्या तसेच संवेदनशील लोकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com