Fish Market: Dainik Gomantak
गोवा

Fish Market: मत्स्य व्यवसाय समुद्रापुरता मर्यादित नाही

Fish Market: नीळकंठ हळर्णकर: कांपाल येथील प्रदर्शनाला मत्स्यप्रेमींची गर्दी

दैनिक गोमन्तक

Fish Market: मत्स्य्य उद्योग आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण आहे. राज्य आणि केंद्र सरकार निलक्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असून आता मत्स्य व्यवसाय केवळ समुद्रापुरता मर्यादित राहिला नसल्याचे प्रतिपादन मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले.

ते 7 व्या ॲक्वा गोवा मत्स्य्य महोत्सवाच्या उद्‍घाटनसमयी बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्‍ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार जीत आरोलकर, महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.

मंत्री हळर्णकर म्हणाले, केंद्र सरकारद्वारे मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. राज्य सरकारही सदोदित मदतीसाठी तत्पर आहे. . मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, तंत्रज्ञानाचा वापर करत मत्स्य व्यवसाय केल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

दरम्यान, जयंती तारी, पद्मा रायकर, निरज गावस, विदा डिसोझा, लविना डिसोझा, लक्ष्मी रत्नाकांत नाईक यांना शासनाद्वारे अनुदान पत्रांचे वाटप करण्यात आले.

‘संधीचे सोने करा’

गोव्यातील जनता ही मत्स्यप्रेमी आहे. एक दोन दिवसानंतर मत्ससेवनाशिवाय आम्ही राहू शकत नाही. गोवा समुद्रकिनाऱ्यावर वसलेला प्रदेश आहे, परंतु आम्ही जेवढा फायदा करून घ्यायला हवा होता, तेवढा झालेला नाही. केंद्र सरकार मत्स्य व्यवसाय वाढीसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवत आहे. या संधीचे सोने करत नागरिकांनी स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT