Goa Politics: ‘इव्हीएम’ म्हणजे महाघोटाळा

Goa Politics: देशाचे संविधान व लोकशाही टिकवायची असेल, तर सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हटविणे आवश्यक आहे. इव्हीएम मशीन म्हणजे भारत देशात सुरू असलेला महाघोटाळा आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: देशाचे संविधान व लोकशाही टिकवायची असेल, तर सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हटविणे आवश्यक आहे. इव्हीएम मशीन म्हणजे भारत देशात सुरू असलेला महाघोटाळा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे वकील तथा संयुक्त मोर्चाचे आयोजक भानूप्रताप सिंग यांनी सांगितले.

वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे भाजप राज्य करीत आहे. इविएम मशीन वर बंदी आणून निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मत पत्रिकांचा उपयोग करावा, अशी मागणी भानू प्रताप सिंग यांनी केली.

वास्को येथे इव्हीएम मतदान प्रक्रियेविरोधात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत इव्हीएम मशीनने मतदारांमध्ये संशय निर्माण केला असल्याची माहिती संयुक्त मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी दिली.

Goa Politics
Lok Sabha Election: निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

याप्रसंगी संयुक्त मोर्चाचे तांत्रिक अभियंता अतुल पटेल यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून कशाप्रकारे मतामध्ये बदल घडवून आणले जातात याची माहिती दिली. इव्हीए मशीन हा महाघोटाळा असून मोदी सरकारला निवडणूक आयोगाचाही पाठिंबा मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, शंकर पोळजी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com